Thursday, February 19, 2026
Homeसाहित्यशिवजयंती : दोन काव्ये

शिवजयंती : दोन काव्ये

1) शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजे महान
प्रजाहितदक्ष अनाथांचे नाथ करिती कल्याण IIधृII

शिवबांना माता जिजाऊ लाभले राजे शहाजी तात
शिवनेरी किल्ला जुन्नर महाराजांचे जन्मस्थान
जिजाऊंनी शिकवले शौर्य महाभारत रामायण II1II

गुरु दादोजींनी शिकवले शस्त्रास्त्र चालवणं
तलवारबाजी दांडपट्टा घोडे स्वारी दिले शिक्षण
शिकवले युद्धकलांमध्ये विशेष नैपुण्य II2II

मावळ प्रांतात फिरले सर्वत्र सवंगड्यां सोबत
फिरताना रयतेचे दुःख जाणलं
हिंदवी स्वराज्याची प्रेरणा झाली जागृत II3II

तुकोबा रामदासांनी राज्यकारभार नितिचे दिले शिक्षण
सोळाव्या वर्षी मंदिरात स्वराज्याची घेतली शपथ
तोरणा किल्ला जिंकून रोवली स्वराज्य मुहूर्तमेढ II4II

महाराजांचे अष्टप्रधान मंडळात होते मंत्री आठ
प्रत्येक मंत्री आपापल्या खात्यात तरबेज निष्णांत
आरमाराचे जनक भवानीचे पूजक करती रक्षण II5II

महाराजांनी एकशे अकरा किल्ले बांधले नवीन
महाराजांची रणनिती गनिमीकावा आधारित
भूगोल वेग मुत्सद्दी अभ्यास करती कल्पकतेनं II6II

शूर द्रष्टे शिवअवतार युगपुरुष नितीवंत
तेज:पुंज श्रीमंत योगी कीर्तीवंत शुद्ध आचरण
आजच्या काळात त्यांचे विचार करिती मार्गदर्शन II7II

निश्चयाचा महामेरू राहे बहुतजनांस आधार
गो-ब्राह्मण प्रतिपालक होत क्षत्रिय कुलभूषण
जाणता राजांना करू मानाचा मुजरा कृतज्ञतेनं II8II

अरुण गांगल

— रचना : अरुण गांगल. कर्जत- रायगड.

2 ) शिव वैशिष्ट ..

शिवराय सु स्वभाव
जाणा रत्न वैशिष्ट्य
अन्यत्र अति विरळा
गुणांचे वैभव विशिष्ट

आऊंच्या आशिर्वादे
गाठे स्वराज्य उदिष्ट
जिवाभावाचे मावळे
एक होती एक निष्ठ

विविध असून जाती
राज्यात रयत संतुष्ट
गनिमी कावा सोडवे
समस्या असो क्लिष्ट

महिलांना छळण्याचे
कुणात नाही धारिष्ट
भगव्या ध्वजा समोर
समस्त होती आकृष्ट

जिंकलेले पराक्रमाने
किल्लेबांधले उत्कृष्ट
शिवबा मन कळवळे
मावळ्यांस जरा कष्ट

वाटचाल सुराज्याची
फळे चाखी स्वादिष्ट
असे राजे होणे नाही
छत्रपतींची काढे दृष्ट

आजी सांगे नातवंडा
शिव महाप्रताप गोष्ट
हरेक पिढीला वारसा
कथामृत अति चविष्ट

हेमंत मुसरीफ

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments