श्री चक्रधर स्वामी सार्वजनिक वाचनालय व महदंबा साहित्य संघ, शेवाळा या संस्थेच्यावतीने गेली १४ वर्षे साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येतात.सन २०२० या वर्षासाठीचे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत.
आद्य ग्रंथकार म्हाइंभट पुरस्कार :-
प्रा. डाॅ. किरण वाघमारे : महानुभावीय सिध्दांत सूत्र व पक्षकार, अकोला.
प्रकाशक : लोटस अँड कोब्रा पब्लिशिंग हाऊस.
महदंबा ( महदाईसा ) स्मृती पुरस्कार :-
श्री शिवाजी सातपुते : दखल बेदखल, मंगळवेढा.
प्रकाशक : शब्द शिवार प्रकाशन.
आचार्य आनेराज व्यास पुरस्कार :-
डाॅ. श्रीकांत पाटील : लाॅकडाउन, ता. हातकणंगले.
प्रकाशक : सप्तर्षी प्रकाशन
श्री भास्कर भट्ट स्मृती पुरस्कार :-
डाॅ. केशव सखाराम देशमुख : एका प्रकाशकाची प्रकाशयात्रा, नांदेड.
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन .
आचार्य केशिराज व्यास पुरस्कार : अनघा तांबोळी : धुकं, नवी मुंबई.
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन.
नरेंद्र स्मृती पुरस्कार :-
प्रा. स्वाती कान्हेगांवकर : बंध -अनुबंध, नांदेड.
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन.
पुरस्कार वितरण समारंभ श्री चक्रधर स्वामी जयंती निमित्त होईल. पण कोरोनाची परिस्थिती बघता पुरस्कार वितरणाची तारीख निश्चित करण्यात येईल. पुरस्कार निवड समितीमध्ये प्रा. रमेश वाघमारे, सुरज कुमार बाणकर, यशवंत जामोदकर, अनिल शेवाळकर यांनी काम पाहिले. तसेच वाचकांनासुध्दा पुस्तक देऊन त्यांचे मत विचारात घेण्यात येते हे विशेष. – देवेंद्र भुजबळ.9869484800.
There is certainly a great deal to find out about
this topic. I love all of the points
you?ve made. https://opuredistribution.com/blogs/infos