Saturday, June 14, 2025
Homeसाहित्य"संत कबीर"

“संत कबीर”

आपल्या दोह्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री संत कबीर यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्दांजली.
संत कबीर यांना विनम्र अभिवादन !
— संपादक

संत कबीरांनी विश्वाला दिली ज्ञानाची ज्योत
फकीर जोगी ईश्वरभक्तांस करू या वंदन IIधृII

लहरतारा तळी सापडले मूल पंकजात
अनाथां भेटले निमा निरू मात पिता रूपांत
विणकर पुत्राचे झाले कबीर नामकरण II1II

रूढी परंपरा धर्मांधतेत गेले बालपण
परिस्थितीमुळे न मिळाले त्यांना शिक्षण
अनुभव मिळाले साधुसंतांच्या सत्संगात II2II

निर्भिड निर्गुण भक्ती शिकवे कवी महान
रमेनी सबद साखी दोहे रचिले कबिरानं
कबीरांचे हिंदी साहित्यात महत्व अनन्य II3II

कबीराचे दोहे हिंदू यवनांना करी एकत्र
शिकवती समभाव सर्वां टाळती भेदाभेद
राम गोविंद गोविंद हरी करती उच्चारण II4II

कबीरांना व्यवहारिक बाबींचे सूक्ष्मज्ञान
सर्वांत प्रचंड शक्ती आहे पहावे ओळखून
कबीरांची वाणी शक्तीवर्धक अमृता समान II5II

कबीराची साधी राहणी उच्च तत्वज्ञान
शिकवले जगाला सहज धर्माचे आचरण
निर्गुण निष्काम भक्ती त्यांच्या भजन दोह्यांत II6II

कबीर आदर्श समाज सुधारक श्रेष्ठ संत
सहज सरळ सोप्या भाषेत देती ज्ञान
विकृत प्रथांना मोडून करिती प्रबोधन II7II

अहं गळल्यावर स्फुरते प्रेमाचे सृजन
प्रेम वेदना करुणा ममता उमदे पण
कबीर सांगी प्रेम सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम ज्ञान II8II

अरुण गांगल

— रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?
शितल अहेर on हे असं कां होतं ?
शितल अहेर on पु ल स्मरण
अदिती साळवी...दूरदर्शन.. on माध्यम भूषण डॉ. किरण चित्रे
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम भूषण डॉ. किरण चित्रे
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on माध्यम भूषण डॉ. किरण चित्रे