काही सण,
शब्दांचे फेर धरत, नाचत येतात….
केशरी, पिवळे रंग,
आसमंतात उधळत रहातात….
मनाला. ..भक्तीच्या, श्रध्देच्या, भावनांनी भारावतात…
सोन्याच्या, सोनेरी क्षणांसारखे …
अनुभव देतात.
काही सण,
तेजाच्या ज्योती, उजळत येतात…..
प्रकाशानी, चित्तवृत्ती फुलवत रहातात रांगोळ्यांनी आयुष्य रंगवत जातात…
सहवासांनी नाती, बहरत ठेवतात…..
काही सण,
गोडवा देत, तनाला प्रेरणा,
शक्ती पुरवतात..
स्निग्धतेचे बंध, मनामनात फुलवतात….
जुने विसरून, नवी सुरवात करून देतात….
मनातला आनंद, तिळातिळानी वाढवतात….
पूर्वजांची आहे ही पुण्याई….
त्यांनी पटवली ….सणांची महती….
आनंदली, घराघरातली बाई….
आणि परंपरेनी, जपली तिने संस्कृती सारी…
— रचना : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800