Wednesday, September 17, 2025
Homeपर्यटन'सफर शिकागोची' ( ४ )

‘सफर शिकागोची’ ( ४ )

आज मी शिकागोतील सर्वात उंच इमारत असलेल्या विलीस टाॅवर विषयी सांगणार आहे. तसे पाहिल्यास उंच इमारत निर्माण करण्याचा श्रीगणेशा याच शहरात सुरू झाला, याचा मागच्याच लेखात त्याचा उहापोह केला आहेच.

तत्पूर्वी मानवी स्वभावातील इर्शा त्यांना स्वस्थ बसू देतच नव्हती.जगभरातील मानवनिर्मित उंच बांधण्यात आलेल्या वास्तु त्याच्या साक्षीदार आहेत. भारतात चितोडचा विजयस्तंभ, चीनच्या लाँगेस्ट भिंती नंतर कुंभलगडची भिंत, मीनाक्षी मंदिराची गोपुरं, ओरिसातील मंदिरे, कुतुबमिनार, पॅरिसचा आयफेल टाॅवर, अशा अनेक वास्तु आहेत. त्यांची यादी मारूतीच्या शेपटा सारखी वाढत जाईल.

आता जगभरातील उंच इमारती विषयी ! वानगीदाखल पहिल्या दहा उंचच उंच इमारतीची धावती माहिती घेऊ. बुर्ज खलिफा दुबई, शांघाय टाॅवर, चायना झूम बीजिंग, चीन, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जागी नवीन बांधलेला शांती स्मारक, मक्का राॅयल सौदी अरेबिया इत्यादी… असो.

आता शिकागोतील विलीस टाॅवर बाबत… ह्या इमारतीचे बांधकाम 1974 मध्ये पुर्ण झाले. याची उंची 412 मीटर आहे. 103 मजल्यावर एक निरिक्षण डेक आहे. त्याला चार बाल्कन्या असून त्यामधून शिकागो शहराची विहंगम दृश्ये दिसून येतात. दिवसातील कोणतीही वेळ असो आपण तो नजारा पाहून मंत्रमुग्ध होतो.

आम्ही शिकागो शहरात प्रवेश केल्यावर कित्येक किलोमीटर अंतरावरून विलीस टाॅवर दिसू लागले. त्या टाॅवर बाबत थोडक्यात माहिती मिळाली होतीच. रात्रीचे अकरा वाजले होते. अनेक उंच इमारती नेत्रदीपक रोषणाईने न्हावून निघाल्या होत्या. त्यांच्यावर विविध प्रकारच्या रंगांची उधळण केली होती. नव्या नवेली प्रमाणे विलीस टाॅवर आणि आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर ताजातवाना भासत होता. विलीस टाॅवरच्या जवळून जाताना त्याची भव्यता अधिकच अधोरेखित झाली होती. जे जे पाहात होतो ते आठवणीच्या कप्प्यात दोन नयनांच्या मदतीने साठवून ठेवत होतो.

विलीस टाॅवर पाहाण्यास दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. विशेषत: जगभरातील आर्किटेक्टचे विद्यार्थी या टाॅवरच्या रचनेचा, त्यातील कलात्मक बाबींचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. विलीस टाॅवर शिकागो शहराची शान आहे. पहचान झाली आहे.
( क्रमश: )

भास्कर धाटावकर

– लेखन : डाॅ.भास्कर धाटावकर.
निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं