घरून पळून येणाऱ्या मुलांचे समुपदेशन करून त्यांना घरपोच करणाऱ्या ठाणे येथील समतोल फौंडेशन 19 तारीख नोहेंबर 2021 रोजी संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत हजारो दिवे लावुन मुलांच्या आयुष्यात दिप प्रज्वलित करीत आहे….
समतोल फांऊंडेशन चा दिपोत्सव कार्यक्रम म्हणजे संस्थेचा वर्धापन दिवसच असतो. त्रिपुरारी पौर्णिमेला दरवर्षी कार्यक्रम संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्र मामणोली हिंदु सेवा संघ, कल्याण येथे सातत्याने 14 वर्षे सुरू आहे. माधव जोशी यांनी दरवर्षी एक विशेष कार्यक्रम केला पाहिजे अशी कल्पना सुचवली आणि 2008 पासुन हा दिपोत्सव सुरु झाला.
सर्वात पहिल्या दिपोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री दादा इदाते यांनी (मा. अध्यक्ष -राष्ट्रीय भटक्या विमुक्त आयोग) आर्शिवाद दिला होता. यानंतर प्रत्येक वर्षी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. कोरोना सारख्या काळात सुद्धा यामध्ये खंड पडला नाही.
आकर्षक रांगोळी आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे दरवर्षी आकर्षण असते. यावर्षी सुद्धा “स्रुजनयात्रा” म्हणून सामाजिक कार्याची आवड असणारे सातारा येथील 50 तरूण/तरूणी या दिपोत्सव मध्ये सहभागी होत आहेत. त्याचबरोबर जीवन संवर्धन संस्था, म्हसकळ येथील 75 बच्चे कंपनी असतील. खूप मौज मस्ती करतील.
आपल्या सर्वाचेच मनोरंजन करण्यासाठी गुजरात मधील 20 विद्यार्थी न्रुत्य कला सादर करतील. शिवाय समतोल ची मुलेही मनोरंजन करतील.
यावर्षी बाल कल्याण समिती,
जिल्हा ठाणे अध्यक्ष डॉ सुधीर सावंत,
कल्याण रेल्वे पोलीस निरीक्षक,
ठाणे शहर आमदार संजय केळकर,
मुरबाड शहर आमदार किसन कथोरे,
जिल्हा महिला व बाल अधिकारी महेंद्र गायकवाड,
एस हरीहरण, समतोलचे सर्वेसर्वा विजय जाधव.
असे मान्यवर उपस्थित असतील.
वेगवेगळ्या राज्यातील, वेगवेगळ्या भाषेतील व वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घेऊन अनेक मुले समतोल च्या संपर्कात येतात. वर्षांत किमान 600 मुले जी फसवणूक करून आणली जातात, घरापासून दूर झालेली असतात, घरातुन वेगवेगळ्या कारणांमुळे घर सोडलेली असतात या मुलांचे मनपरिवर्तन करून राष्ट्रीय स्तरावर कुटुंबात जोडून विकासात्मक पुनर्वसन केले जाते.
आतापर्यंत संस्थेने 12000 पेक्षा जास्त मुलांना कुटुंबात जोडले आहे. त्यांच्या आयुष्यात पुन्हा दिप प्रज्वलित केले आहेत. याची आठवण म्हणून दरवर्षी
“एक दिया समतोल के लिए” अशी हाक देणगीदारांना दिल्या जाते.
बालकांशी संबंधित 12 प्रकल्प समतोल चालवते. त्यामध्ये सेंद्रिय शेती, अन्नछत्र, गोशाळा, कलाकौशल्य, महिला सक्षमीकरण, कार्यकर्ता प्रशिक्षण असे नवीन विषय सक्षमपणे सुरू आहेत. समतोल चा आर्थिक व्यवहार हा फक्त लोकांच्या वैयक्तिक देणगीवर चालतो. संस्थेला कोणत्याही फंडीग एजन्सी व शासकीय अनुदानाची गरज भासली नाही कारण समतोल च्या कार्यावर समाजाचा विश्वास आहे आणि तो विश्वास अधिक द्रुढ होण्यासाठी संस्था सतत प्रयत्न करीत आहे.
बालप्रेमी समाज हे समतोलचे मुख्य लक्ष आहे यासाठी समतोल राष्ट्रीय स्तरावर कार्य करीत आहे. प्रत्येक मुलाने आपल्या राज्यात/जिल्ह्यात, आपल्या भाषेत आपल्या कुटुंबाशी जोडून विकास करावा यासाठी समतोल पुनर्वसन केंद्र चालवते. बालकांशी संबंधित सर्व शासकीय अधिकारी, यंत्रणा, विभाग यांना जोडून काम करीत आहे.
आज समतोलचे 5 जिल्ह्यात 10 रेल्वे स्टेशनवर काम सुरू आहे. आता अनेक राष्ट्रीय स्टेशनवर काम करण्याची संस्थेने तयारी सुरू केली आहे.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800