Monday, June 16, 2025
HomeUncategorized"समाजभूषण २" जोशात प्रकाशन

“समाजभूषण २” जोशात प्रकाशन

सौ रश्मी हेडे यांनी लिहिलेले आणि न्यूज स्टोरी टुडे ने प्रकाशित केलेले “समाजभूषण २” या यश कथा संग्रह
असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन, जागतिक पुस्तक दिनी, म्हणजेच २३ एप्रिल रोजी पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे सलग ४ वर्षे अध्यक्ष राहिलेले श्री हेमंत रासने यांच्या हस्ते श्री कालिका देवी संस्थान च्या सांस्कृतिक सभागृहात झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थानचे अध्यक्ष श्री आनंद डांगरे होते.

व्यासपीठावर पुणे जिल्हा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र अचलारे, विद्यमान अध्यक्ष श्री रमाकांत कानडे, श्री कालिका देवी ट्रस्ट,सातारचे विश्वस्त, ज्येष्ठ कर सल्लागार श्री हेमंत कासार, न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ, लेखिका सौ रश्मी हेडे, प्रकाशिका सौ अलका भुजबळ आदी उपस्थित होते. यावेळी तुडूंब भरलेल्या सभागृहात प्रकाशन प्रसंगी झालेल्या आतशबाजीने आणि ढंगदार संगीताने संपूर्ण वातावरणात जोश निर्माण झाला.

प्रारंभी प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांनी सर्वांचे स्वागत करून न्यूज स्टोरी टुडे पोर्टल ची
(www.newsstorytoday.com) वाटचाल, त्यातून निर्माण होत असलेली दर्जेदार पुस्तके याची सविस्तर माहिती दिली.

लेखिका सौ रश्मी हेडे यांनी पुस्तकामागची भूमिका विशद करताना, या यश कथा नव्या पिढीला प्रेरणादायी असा विश्वास व्यक्त करून, ज्यांनी विश्वासाने त्यांचा जीवन संघर्ष सांगितला त्यांचे व न्यूज स्टोरी टुडे चे आभार मानले.

या वेळी बोलताना श्री हेमंत रासने यांनी पारशी समाजाचे उदाहरण दिले. पारशी समाज संख्येने कमी असूनही देश उभारणीत या समाजाचे जे योगदान आहे, त्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे सांगून आपला देश सशक्त, समृद्ध व्हावा यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे असे आवाहन केले.

सर्वश्री राजेंद्र अचलारे, हेमंत कासार, रमाकांत कानडे यांचीही यावेळी समयोचीत भाषणे झाली.

पुस्तकात समाविष्ट असलेल्या समाज भूषणांपैकी ज्येष्ठ कृषितज्ज्ञ प्रा डॉ ज्ञानदेव कासार, युवा उद्योजक श्री प्रणित कुंदप, राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक श्री महेश खुटाळे यांनी दिलखुलास पणे मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री आनंद डांगरे यांनी यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती पुढे “रोल मॉडेल” असणे कसे आवश्यक आहे हे सांगून या पुस्तकातील प्रत्येक व्यक्ती ही रोल मॉडेल आहे, असे गौरवद्गार काढले. लेखक, प्रकाशक यांनी पुस्तक प्रकाशित करून त्यांचे काम केले आहे पण पुस्तक केवळ वाचून स्वस्थ न बसता यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे कसे आवश्यक आहे, याची अत्यंत प्रभावीपणे मांडणी केली.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री मंदार सासवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अनिल हेडे यांनी केले.

विशेष म्हणजे, जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधुन या पुस्तकाचे प्रकाशन होत असल्याबद्दल सर्वच वक्त्यांनी आनंद व्यक्त केला.

या पुस्तकात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या, देश विदेशातील ३७ व्यक्तींच्या यश कथा आहेत. या यश कथा न्यूज स्टोरी टुडे या वेबपोर्टल वर प्रसिध्द झालेल्या आहेत.

या पूर्वी या पोर्टलवर प्रसिध्द झालेले, सौ वर्षा महेंद्र भाबळ यांचे “जीवनप्रवास” हे पुस्तक गेल्या डिसेंबर महिन्यात मुंबई येथे प्रकाशित झाले. तर निवृत्त पोलीस उपअधीक्षक सौ सुनिता कुळकर्णी नाशिककर यांचे,
मी, पोलीस अधिकारी” हे आत्म कथन छापून तयार असून प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

विविध पुरस्कार प्राप्त, न्यूज स्टोरी टुडे पोर्टल आणि त्यातून आकारास येत असलेले विविध उपक्रम म्हणजे प्रसार माध्यमातील अभिनव प्रयोग आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. लेखिका रश्मी हेडे व प्रकाशिका सौ.अलका देवेंद्र भुजबळ व न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक माननीय देवेंद्रसर, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ! न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे नवीन क्षेत्रात झालेले पदार्पण, यशाच्या सुमनांनी बहरत जावो !
    हीच सदा शुभेच्छा !

    • धन्यवाद वर्षा असाच स्नेह वृद्धिंगत व्हावा हिच सदिच्छा 🤝

  2. समाजभूषण 2 या पुस्तकाच्या प्रकाशनाची सविस्तर बातमी वाचली आणि आपल्या news story today
    बद्दल अभिमान वाटला.हल्ली वर्तमान पत्रातील बातम्या आणि विविध चॅनल्स वरून दाखवल्या जाणाऱ्या राजकारणी लोकांचे तू तू मैं मैं यामुळे आपण सैरभैर होऊन आपल्याला आदर्श मिळेनासा होतो.आपल्यासमोर रोल मॉडेल असणे खरेच गरजेचे आहे.रश्मी हेडे यांनी या यशकथा लिहून समाजासाठी एक उत्तम काम केले आहे.अभिनंदन रश्मी यांचे तसेच संपादिका अलकाताई भुजबळ यांचे.

    • खुप खुप धन्यवाद मेघना ताई आपले आशीर्वाद हिच सदिच्छा🤝

  3. खूपच छान झाला कार्यक्रम …! सौ. रश्मीताई हेडे, सौ. अलकाताई भुजबळ , श्री. देवेंद्र साहेब यांच्यासोबतच श्री. आनंद डांगरे जी , सर्व आयोजकांचे आणि मुळातच समाजभूषण या पदवीपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट केले , बुद्धिमत्ता लढवली आणि यशोप्राप्ती केली; त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन …!
    न्यूज स्टोरी टुडे जे काही उपक्रम राबवते आहे ,
    ते अतिशय चांगले आणि सकारात्मक असेच असतात… अनेकवार धन्यवाद…!!
    … प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह,गुरुकृपा संस्था.
    9921447007

    • धन्यवाद प्रशांतजी, आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिलात खुप छान वाटले. आपणा सोबत बोलावयास मिळाले नाही त्याबद्दल क्षमस्व. पुनश्च आभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments