Tuesday, September 16, 2025
Homeबातम्यासमाजसेवी रिक्षाचालक

समाजसेवी रिक्षाचालक

नवी मुंबईतील कळंबोली येथील रहिवाशी पंकज रामशंकर शर्मा सर्वसामान्य रिक्षाचालक आहेत. परंतु त्यांचे कार्य समाजासाठी खूपच उपयोगी व प्रेरणादायी आहे.

नवी मुंबई, पनवेल परिसरात अपंग, आर्मी, आणि दवाखान्यातील रुग्णांना कायस्वरूपी ते मोफत सेवा देतात. अपंग, आर्मी आणि रुग्णांकडून ते प्रवासाचे कधीच पैसे घेत नाहीत. संपूर्ण नवी मुंबई मध्ये अशी सेवा देणारे ते एकमेव रिक्षाचालक आहेत.

समाजाची रात्रंदिवस, 24 तास सेवा करत असल्याने पंकज शर्मा यांचा कोरोना योद्धा म्हणून अनेक जणांनी सत्कार केला आहे.

आजच्या धकाधकीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या युगात माणुसकी लोप पावत चालली आहे.मात्र दुसरीकडे माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या अशा प्रकारच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पंकज शर्मा यांच्या समाजसेवी वृत्तीचे जनतेने देखील कौतुक केले आहे.

आर्मी लव्हर म्हणून परिचित असलेले पंकज शर्मा यांचे आर्मी मध्ये जाऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न होते परंतु ते पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे अपंग, आर्मी, हॉस्पिटल मधील रुग्णांना रिक्षा द्वारे कायमस्वरूपी मोफत प्रवास सेवा देऊन देशसेवा करण्याचा संकल्प त्यांनी केला. तेंव्हापासून आजपर्यंत व पुढेही हा संकल्प चालू ठेवणार असल्याचे पंकज शर्मा यांनी सांगितले.

नवी मुंबईतील अपंग, आर्मी, हॉस्पिटल मधील रुग्ण यांनी मोफत प्रवासासाठी पंकज शर्मा यांच्या
7039539956 या फोन नंबरवर संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पंकज शर्मा यांचे अनुकरण इतर भागातील रिक्षाचालक, टॅक्सी ड्रायव्हर यांनी केल्यास त्या सर्वांकडून मोठीच सेवा घडेल आणि त्यांची प्रतिमा निश्चितच उजळून निघेल, यात काही शंकाच नाही.

विठ्ठल ममताबादे.

– लेखन : विठ्ठल ममताबादे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ.  9869484800.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. पंकज शर्मा यांचे कार्य स्पृहणीय व अभिनंदनीय आहे त्यांना सलाम

  2. अपंग, आर्मी, हॉस्पिटल मधील रुग्णांना रिक्षा द्वारे कायमस्वरूपी मोफत प्रवास सेवा देऊन देशसेवा करणारे रिक्शा चालक श्री पंकज शर्मा यांना मानाचा मुजरा.
    खरेच आजच्या धकाधकीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या युगात माणुसकी लोप पावत चालली आहे. मात्र दुसरीकडे माणुसकी जिवंत ठेऊन देशसेवा करणारे श्री पंकज शर्मा यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments