भारत सरकारने विविध समाज माध्यम मंचाचा वापर करणाऱ्या सामान्य जनांच्या डिजिटल माध्यमांवर प्रकाशित साहित्यविषयक तक्रारींचे निवारण करणे तसेच त्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करणे शक्य व्हावे यासाठी 25 फेब्रुवारी 2021 पासून नवे माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि माध्यमांसाठी आचार संहिता) नियम 2021 अधिसूचित केले आहेत, हे तुम्हांला माहितच आहे.
आचारसंहिता आणि डिजिटल माध्यमांशी संबंधित प्रक्रिया आणि सुरक्षा यंत्रणा यांच्याशी संबंधित असलेला नियमांचा तिसरा भाग केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत लागू केला जात आहे.
या संदर्भात, पत्र सूचना कार्यालयाने डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेची अंमलबजावणी आणि त्यासंदर्भातील तर्कसंगत विचार याबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण देण्यासाठी एक वेबिनार आयोजित केला आहे.
या वेबिनारमध्ये मुख्य वक्ते म्हणून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सह-सचिव विक्रम सहाय मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मुख्य वक्त्यांच्या मार्गदर्शनानंतर प्रश्नोत्तर सत्र होणार आहे.
हे वेबिनार सर्व डिजिटल वृत्त माध्यमांसाठी तसेच डिजिटल आशय/ सामग्री निर्मितीशी संबंधित व्यक्तींसाठी उपयुक्त राहील.
दिनांक : सोमवार. 12 जुलै 2021
वेळ : दुपारी 3 वाजता
या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी कृपया https://forms.gle/T29k1b2UARvoJxaA9
या लिंकवर नोंदणी करा अथवा आपल्या प्रतिनिधीचे नाव लवकरात लवकर नोंदवा.
किंवा
खालील तपशील pibmumbai@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवा.
1. नाव
2. संस्था
3. पदनाम
4. मोबाईल / दूरध्वनी क्रमांक
5. ईमेल
याविषयी काही शंका असल्यास, सुनंदा भालचीम (मो. : 9967268257) किंवा चंद्रशेखर यादव (मो. : 9340448305) यांच्याशी संपर्क करा.
– पत्र सूचना कार्यालय, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800
लिंक ओपन होत नाही आहे.
Right click is disabled. You can type it or contact the persons number given.
Thank you.
– Devashri
You can open it now. I have made the changes. Thank you for bringing in notice.
– Devashri Bhujbal
लिंक ओपन नाही होत आहे.
Link open hot nahi Right click option disebal aahe
Link will open Sir just click on it. Yes, right click is disabled.
– Devashri
It will open now. I have made the changes. Thank you for bringing in notice.
– Devashri Bhujbal