Tuesday, June 17, 2025
Homeसाहित्यसाथ...साथ...

साथ…साथ…

जिथे सावली दूर जाते जराशी
तिथे तू मला सावरशील का
सांग ना सख्या रे
तू मला साथ देशील का ???

कवडसे येतील अन् जातील
कवडस्याचा छायेतून येणाऱ्या
त्या इवल्याश्या उजेडात
तू फक्त मलाच पहाशील का ???

सांग ना रे सख्या तू
तू मला साथ देशील का ???

सोने नाणे न येवला पैठणी
नकोय मला गाडी न बंगला
हवीय ती फक्त तुझीच साथ
साता जन्माची कायमचीच

सांग ना रे सख्या तू
तू मला साथ देशील का ???

आयुष्यात पाहिले दोघांनी
खूप सारे दुःखाची वाळवी
आता आयुष्याच्या सांजवेळी
तुझाच आधार देशील ना

सांग ना रे सख्या तू
तू मला साथ देशील का ???

सुख दुःखाची सारी गणिते
वजा कमी अधिकच जाहले
दुरावा सहन करावाच लागला
नियतीने खेळ जिंकून घेतले

नियतीचा संकेत समजले नाही
मीलन जणु मृगजळ होते
दुनियादारी निभावून नेण्यासाठी
प्रेमाला तिलांजली दिली होती

आता तरी फक्त एकच मागणे
येऊ देत कितीही संकटे
वाट मिळून शोधू दोघेही
आहोत एकत्र दोघे नाही एकटे

जरी सभोवती दाट अंधार
अंधारातील एक ज्योत बनून
आयुष्यभराची साथ देशील ना
सांग ना रे सख्या तू मला

मला तू साथ देशील ना ???

परवीन कौसर

– रचना : परवीन कौसर. बेंगलोर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments