शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेवारी व धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती २७ जानेवारी रोजी असते. या दोघांच्या जयंती निमित्ताने मिलेनियम टॉवर्स मित्र मंडळातर्फे, नवी मुंबईतील सानपाडा येथील प्रख्यात मिलेनियम टॉवर्स च्या शॉपिंग कॉम्ललेक्स च्या वरच्या हॉल मध्ये, काल दि 22 जानेवारी रोजी, आरोग्य शिबीर आणि सानपड्यातील मान्यवरांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम श्री रामचंद्र पाटील व माजी नगरसेविका रुचाताई पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता.
या आरोग्य शिबिराचा १७८ नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी बहुतेकांनी नेत्र, दंत तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी करून घेतली. तर २१ जणांनी आयुर्वेद तपासणीचा लाभ घेतला.
यावेळी प्रभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मिलेनियम टॉवरमधील रहिवासी निवृत्त माहिती संचालक तथा ‘न्यूज स्टोरी टुडे’ या वेबपोर्टल चे संपादक देवेंद्र भुजबळ, कोविड काळात न डगमगता काम करणारे डॉ. कल्याण शेट्टी, डॉ. व्यंकटेश हंचाटे, डॉ.सौ वैशाली हंचाटे, डॉ राजपाल, दैंनिक लोकदृष्टीचे संपादक दिनेश पाटील, दैनिक प्रहार चे पत्रकार शेषराव वानखेडे, फॅन्सी रिहाबिलेशन ट्रस्ट या दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष, निवृत्त कस्टम अधिकारी एस ए राजन आदींचा सन्मानचिन्ह, वह्या व पेन भेट देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना नवी मुंबईचे माजी उप महापौर अशोक गावडे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचे धोरण आपण नेहमीच अमलात आणले पाहिजे. आपल्या जीवनातील वाचन आणि लेखनाचे महत्वही त्यांनी यावेळी विशद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री रामचंद्र पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास सानपाडा विभागातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा सचित्र वृत्तांत आपण पुढील व्हिडीओत पाहू शकता.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800