सोशल मीडिया चे जसे अनेक फायदे होत आहेत, तसेच अनेक तोटेही होत आहेत. तोट्यांपैकी काही महत्वाचे तोटे म्हणजे आर्थिक फसवणूक, महिलांची तर आर्थिक आणि इतर प्रकारची फसवणूक, ग्राहकांची फसवणूक अशा किती तरी बाबी सांगता येतील.
आता तर एक नवीनच फसवणुकीचा प्रकार घडू लागला आहे. इंग्रजीत त्याला “सायबर डिटेंशन” म्हणतात. तर मराठी त त्याला आपण “सायबर अटक” म्हणू या.
तर सायबर अटक हा नेमका काय प्रकार आहे, त्या पासून स्वतःला कसे वाचवावे या विषयावर लोकप्रिय आय पी एस अधिकारी श्री विश्वास नांगरे पाटील यांनी अतिशय सहज सुलभ भाषेत मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्ग दर्शनाची क्लिप पुढे देत आहे. ती आपण सर्वांनी पुन्हा पुन्हा पहावी आणि आपली होणारी संभाव्य फसवणूक टाळावी.
ही क्लिप आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या पोर्टलच्या लेखिका, निवृत्त पोलिस उप अधीक्षक सुनीता नाशिककर मॅडम यांचे मनःपूर्वक आभार.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
सायबर गुन्हे ही नवीन डोकेदुखी. यावरचा लेख माहितीपूर्ण.