Home बातम्या ‘सुपर सेफ्टी मॅन’ प्रकाशित

‘सुपर सेफ्टी मॅन’ प्रकाशित

0

भारतात सर्वात जास्त मृत्यू हे रस्ते अपघातांमुळे होत असतात. कायम स्वरुपी जायबंदी होणाऱ्यांची संख्या ही काही लाखात आहे.या वरून वाहतुकीचे नियम किती काटेकोरपणे पाळले पाहिजेत, हे लक्षात येते. ही परिस्थिती विचारात घेऊन
केंद्र सरकारने “रस्ता सुरक्षा महिना” पाळावा म्हणून सूचना दिल्या होत्या.

केंद्र सरकारच्या सूचना आणि या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्ता सुरक्षा विषयक कार्य करणाऱ्या ‘सुरक्षा अभियान ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेने ‘सुपर सेफ्टी मॅन’ नावाचे एक व्यक्तिमत्व तयार करून त्यावर आधारित कॉमिक बुक तयार केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड उपस्थित होते.

या आकर्षक पुस्तकात रस्ता सुरक्षेचे महत्त्व, नागरिकांची कर्तव्ये अधोरेखित करणाऱ्या १३ सुंदर, सचित्र कथा आहेत.

सुपर सेफ्टी मॅन हे कॉमिक एका भारतीय सुपरहिरोची ओळख करून देते, जो केवळ रस्ते अपघातांपासून व्यक्तींना वाचवतोच असे नाही तर रस्ता सुरक्षा विषयक जागरूकता निर्माण करून अपघातांना प्रतिबंध देखील करतो.

हा उपक्रम केवळ मुलांसाठीच नसून प्रौढ लोकं, रस्ता वापर करणाऱ्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. रस्ता सुरक्षेविषयी महत्त्वाच्या संवादाला हे कॉमिक बुक सुरुवात करून देते आणि आपल्या जबाबदारीची जाणीव सुध्दा करुन देते. सुपर सेफ्टी मॅन हे कॉमिक बुक देशभरात आणि राज्यभरात रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन साहित्य म्हणून वापर करता येईल. सुपर सेफ्टी मॅन हे कॉमिक बुक इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.

या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे संपादन -लेखन जेष्ठ पत्रकार डॉ. विलास पवार यांनी केले आहे. तेच सुरक्षा अभियान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तर इंग्रजी आवृत्ती चे संपादन – लेखन सुरक्षा अभियान ट्रस्टचे सचिव तथा डॉ विलास पवार यांचे चिरंजीव अॅड. विराट पवार यांनी केले आहे. हे पुस्तक ओम पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version