मुंबई येथील ह.भ.प.सौ मीरा नंदकुमार रोपळेकर यांना वंदनीय आद्य आचार्य शंकराचार्य, शृंगेरी मठ यांच्या शुभ हस्ते नुकतेच प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हे प्रमाणपत्र ह.भ.प.सौ मीरा नंदकुमार रोपळेकर यांना शृंगेरीच्या मठात आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या गीता पठण स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल प्राप्त झाले.

विशेष म्हणजे, ही गीता पठण स्पर्धा पारंपरिक पध्दतीची नव्हती तर गीतेतील कोणत्याही एका श्र्लोकातील एखादा शब्द सांगायचे, मग स्पर्धत तो श्लोक म्हणावा लागायचा. एका शब्दाचे जेवढे श्लोक असतील ते म्हणावे लागायचे. देशातून अनेक स्पर्धक आले होते. चाळणीतून निवडलेल्या स्पर्धकात ह.भ.प. सौ मीरा नंदकुमार रोपळेकर या होत्या. अंतिम फेरीत त्यांची ४० मिनिटात चाचणी घेण्यात आली. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
यापूर्वी सौ. मीराताईं विठ्ठल मंदिर दादर प, मुंबई आयोजित कीर्तन परिक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. ज्ञानेश्वरी, भागवत, दासबोध, स्वा. वीर सावरकर आदी दिग्गजांवर त्यांची अनेक ठिकाणी प्रवचने, कीर्तने झाली आहेत आणि होत असतात.
“सभाधीटपणा, संस्कृतवर प्रभुत्व, दांडगी स्मरणशक्ती या गुणांमुळे तसेच सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची कृपा व परिवाराचा सक्रिय पाठिंबा यामुळे मला यात गती मिळाली आहे.” असे मीराताईं नम्रपणे सांगतात.
— टीम एन एस टी. ☎️ +91 9869484800
