Saturday, December 13, 2025
Homeकलास्नेहाची रेसिपी : ४०

स्नेहाची रेसिपी : ४०

“धिझ्झा”
दररोज पोळी, भाजी, वरण भात, चटणी, कोशिंबीर असे जेवण बनवून आणि खाऊन खूप कंटाळा येतो. अशा वेळी काहीतरी बदल म्हणून तेच सर्व पदार्थ, भाज्या, पिठे वगैरे वापरून एकच पोटभरीची, काहीतरी नवीन आणि आकर्षक दिसेल अशी डिश बनवली तर ? ज्यामुळे सारेच पाहून आणि खाऊन तृप्त होतील आणि ते पाहून डिश बनवणाऱ्यालाही समाधान मिळेल ते वेगळेच.

आपण धपाटे तर नेहमीच बनवतो. काही वेळा मुलांना ती आवडतं नाहीत, पण हिच धपाटी आपण थोड्या वेगळ्या स्वरूपात म्हणजेच मुलांना ज्याचे सर्वांत जास्त आकर्षण असते, त्या पिझ्झ्याच्या फॉर्म मध्ये बनवले तर ?.. आपणही खुश आणि मुले तर उडया मारत, मिटक्या मारत फस्त करतील. चला मग पाहायचे ना बनवून “धिझ्झा” म्हणजेच धपाटे +पिझ्झा याचे फ्युजन !

साहित्य :
२ वाट्या कणिक, १ वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी दही, कोथिंबीर, हिंग पावडर, हळदपूड, ४-५ लसुन पाकळ्या, २-३हिरव्या मिरच्या, ५-६ स्लाईस प्रोसेस्ड चीझ, अर्धी वाटी मोझरेला चीझ, पिझ्झा सॉस, ७-८ ओलिव्हज्, ७-८ जलेपींनो, मिक्स हर्बस्, टोमॅटो केचप, बटर, थोडे कॉर्न, सिमला मिरची आणि कांद्याचे काप,आवडत असेल तर टोमॅटो चकत्या.

कृती :
धपाटे बेस :
प्रथम एका भांड्यात सर्व पीठे एकत्र मिसळून त्यात मीठ, दही, लसूण मिरची वाटून आणि कोथिंबीर बारीक चिरून हिंग,हळद आणि १ चमचा बटर घालून मस्त मळून घ्यावे. थोडावेळ मुरले की त्याचा एक छोटा गोळा घेऊन त्याला पोळीप्रमाने लाटून काटा चमच्याने भोके पाडून तव्यावर दोन्ही बाजूनी अर्धे भाजून घ्यावे. नंतर एका कडा असलेल्या डोशाच्या तव्यावर बटर घालून त्यावर राहिलेल्या पिठाचा आधीच्या धपाट्यापेक्षा मोठ्ठया आकाराचे बनवून सर्वबाजूनी थोडी जागा सोडून मध्ये प्रोसेस्ड चिझस स्लाईस पसरावेत. त्यावर छोटे धपाटे ठेवून खालून वरच्या धपाट्याला व्यवस्थित बंद करावे म्हणजे ते गरम झाले तरी चिझ बाहेर येणार नाही. मग त्यावर पिझ्झा सॉस थोडा पसरुन लावावा आणि सर्व भाज्या, कॉर्न, आणि शिल्लक सामानाने मस्त सजावट करावी. त्यावर मोझरेला चिझ घालून झाकण ठेवून धिझ्झा मस्त खरपूस भाजून घ्यावा. सर्व्ह करण्याच्या डिश मधे काढून व्यवस्थित कट करून त्यावर केचप, चिली फ्लेक्स, मिक्सहरब्स घालून सर्व्ह करावा.

वैशिष्ट्य :
भाज्या, चिझ, बटर, वेगवेगळी पिठे यामुळे पौष्टिक आणि पूर्णान्न अशी पोट भरणारी ही डिश आहे. मैद्यापेक्षा वेगवेगळी पीठे वापरल्याने तब्येतीस उत्तम आहे. शिवाय खमंग धपाट्याचा बेस असल्यामुळे खूपच टेस्टी लागते. या अशा धपाट्यात कोथिंबीरी ऐवजी आवडत असेल तर मेथी, दुधी भोपळा किंवा कोबी किसून घातला तरी चालतो. आकर्षक दिसणारी ही डिश चवीला तर खमंग आहेच आणि आरोग्यालाही उत्तम आहे.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37
सौ.मृदुला राजे on चित्र सफर : 58
गोविंद पाटील सर on बहिणाबाईं…
सौ.मृदुला राजे on धुक्याची चादर
सौ.मृदुला राजे on बहिणाबाईं…
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on प्रतिभावान प्रतिभा
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on सानपाडा : अनुकरणीय आनंद मेळावा