Sunday, September 14, 2025
Homeसाहित्यस्वरलता

स्वरलता

भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष अष्टाक्षरी रचना….

शत जन्मांची पुण्याई
पंचरत्ने ती जन्मली
मंगेशकरांच्या घरी
पाची जगात गाजली ||

लता आशा उषा मीना
बंधु तो हृदयनाथ
आई-बाबांचे आशिष
सरस्वती देई साथ ||

दुःख सोसले अपार
नाही केलीत तक्रार
मेहनत करोनियां
स्वप्ने केलीत साकार ||

सप्त सुरात फिरतो
लता दीदींचा हो गळा
गीत मधाळ गाऊनी
लावियला जगा लळा ||

गाणे कुठलेही असो
केला रियाज प्रचंड
तिन्ही सप्तकात गाणे
नाही गेले अवघड ||

गाणं कोकिळेच्या स्वरे
केली किमया सुरांनी
वृद्ध अबाल तरुण
जाती गीतात रंगोनी ||

मंगेशाच्या हो कृपेने
केली तुम्ही गाणं सेवा
भाषा कुठलीही असो
दिला प्रासादिक ठेवा ||

कल्पवृक्ष कन्या लता
काय वर्णावा महिमा
आवाजाने वेडे केले
आहे देशाची गरिमा ||

रूप सोज्वळ सात्विक
असे ते आनंदघन
सूर स्वर्गीय लाभले
हरपते तन-मन. ||

किती करावे कौतुक
पडे अपुरी लेखणी
लाभो उदंड आयुष्य
हीच आस आहे मनी ||

मानिनी महाजन

– रचना : सौ.मानिनी महाजन. मुंबई .
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा