बैस अशी निवांत इथे
काम थोडं बाजूला ठेव
संसाराच्या गप्पा करू
आनंदाची करू देवघेव
काही तू सांग, ते मी ऐकतो
मी सांगेन ते, ऐकून घे
निगुतीने संसार कसा केला
याचे रहस्य ते कळू दे
जी पाहिली स्वप्ने तू, मी,
पूर्णत्वास नेली आपण
भरल्या गोकुळात आता
तृप्त, कृतार्थ दोघे आपण
लेकरा बाळांचा आता
उत्कर्ष हा बघतो आहो
समाधानाने मनोमनी
दोघेही सुखावतो आहो
आनंदाचा अन सुखाचा
झोका असाच उंच जावा
ईश्वराची कृपा दृष्टी अन्
हात सदा डोक्यावर हवा.
— रचना : उद्धव भयवाळ. छ. संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
धन्यवाद शेवाळकर सर…
खूप छान कविता!