Monday, February 2, 2026
Homeबातम्या१४ आय. ए. एस. अधिकाऱ्यांच्या बदल्या

१४ आय. ए. एस. अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र शासनाने पुढीलप्रमाणे १४ आय. ए. एस. अधिकाऱ्यांच्या आज, ३० जुलै २०२१ रोजी बदल्या केल्या आहेत.

०१. श्री संजय दैने, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, मालेगाव महानगरपालिका येथे करण्यात आली आहे.

०२. श्री अनिल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांची नियुक्ती सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

०३. श्री पी डी मलीकनेर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांची नियुक्ती आहे त्याच पदी ठेवण्यात आली आहे.

०४. श्री सुरेश जाधव, यांची नियुक्ती आयुक्त, कामगार महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

०५. श्री प्रताप जाधव, उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे या पदी करण्यात आली आहे.

०६. श्री कुमार खैरे, यांची नियुक्ती सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर करण्यात आली आहे.

०७. श्री जी एम बोडके, सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका या पदावर करण्यात आली आहे.

०८. श्री एस जी देशमुख, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

०९. श्री एम देवेंद्र सिंह, यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या पदावर करण्यात आली आहे.

१०. श्री राहुल कर्डिले, यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर
करण्यात आली आहे.

११. श्री जी एस पापळकर, यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर करण्यात आली आहे.

१२. श्री रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी, हिंगोली यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर करण्यात आली आहे.

१३. श्री एन आर गटणे, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या पदावर करण्यात आली आहे.

१४. श्री दीपेंद्रसिंह कुशवाह, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई यांची नियुक्ती सहसचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

– टीम एनएसटी, 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9