आज जागतिक चिमणी दिवस आहे. त्यानिमित्ताने चिऊताई वरची ही कविता आपल्याला नक्कीच आवडेल.
– संपादक
चिऊताई चिऊताई
कसली आहे लगबग
घरट्यासाठी जागा
शोधायची तगमग…..
आडोशाची फांदी
चिमणीला मिळाली
काड्या कापूस दोरे
जमवायला लागली….
चिमणा चिमणी दक्ष
ठेवतात निगराणी
घरट्याजवळ आमच्या
यायचं नाही हं कुणी…..
मऊशार बिछाना
अंडी घालते चिऊ
दोघे मिळून आपण
लक्ष घरट्यावर ठेऊ…..
काही दिवस जाताच
पिल्लं बाहेर आली
चिवचिवाट करत
दोघे आनंदली……
कापसासारखं अंग
इवलेसे पंख छोटे
चिमणी भरवते दाणे
चिमण्याचे लक्ष मोठे…
उडू लागले एक दिवस
चिमणीला कौतुक वाटले
भरारी घेता पिल्लांनी दोघे समाधानाने हसले..
— रचना : अरुणा दुद्दलवार
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800