Saturday, October 5, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.

सर्वांना हवाहवासा गणेशोत्सव सुरू झाला आहे.या निमित्ताने आपणा मनःपूर्वक शुभेच्छा.
मांगल्याचे प्रतीक असलेला हा सण साजरा करताना आपण पर्यावरणाचं नक्कीच भान ठेवत असू,या बद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही.पण हे भान समाजाच्या तळागाळात वेगाने झिरपण्याची गरज आहे.असे काही उपक्रम आपल्या पाहण्यात असतील तर त्या विषयी अवश्य लिहा. असो.
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक


जीवन म्हणजे काय?
या विषयावर लीना फाटक, इंग्लंड यांनी लिहिलेल्या चिंतन पर लेखावर पुढील प्रमाणे प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.


आदरणीय प्रभाताईं चे हे काव्य मनाला भिडणारे आहे . मन भावना नसलेल्या या रोबाट च मानवाला गर्व आहे हे शल्य खूप छान व्यक्त केले आहे . प्रभाताई यांना माझा नमस्कार आणि अभिनंदन सांगाल का .?
-श्री मोहन नाईक,धुळे.


खूप छान.
“जीवन यांना कळले हो” या पैकी आपण आहात हे आपल्या कवितेतून आम्हाला कळलं.
अशाच लिहीत रहा. 🌹🙏

  • श्रीकांत पट्टलवार ,इंग्लंड


अशाश्वत आहे सारे…..
फारच छान कविता, बोलकी…
लीना ताई तुम्ही विषय छान निवडता.👌

  • सौ मीरा पट्टलवार ,इंग्लंड

    Masta ch, kaku,esp bhuk va bhavna hyamulech apan satat ithe yeto ,he notable vatal.,kiti patkan sangitalas karan apan sansar chakrat kaguntato he!!Ek ajun lakshat aala mazya ki tu मोजक्‍या शब्दात mandates मनोगत.
    -मीना खाडिलकर, बंगलोर,

सातारा : अशी ही नवी ओळख …


खुप छान लेख आणि म हत्व पुर्ण इतिहास.

  • डॉ. रोहित मंजुळे, नागपूर


साताऱ्याच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा! वाह!
150 स्पर्धक ते 8000 स्पर्धकांचा प्रवास फक्त 13 वर्षात, वाखाणण्याजोगे आहे।
महत्वपूर्ण माहिती.

  • अपूर्व मंजुळे, अमेरिका


सातारा हा सैनिक भरती साठी प्रसिद्ध आहे हे माहीत होते पण मॅरेथॉन बद्दल आजच माहिती पडले. खूप छान लेख लिहिलंय सातारा बद्दल
– सौ.शितल अहेर, खोपोली


सातारा हिल ऑफ मॅरेथॉन या स्पर्धाची माहिती मला नव्हती त्याबद्दलचे वर्णन वाचुन आपणही यात सहभागी व्हावे असे वाटायला लागले…. माहितीत नवीन भर पडली… धन्यवाद आश्लेषा…
– सौ. साधना ग्याले, पुणे


साताऱ्याची आन बान शान गौरवास्पद आहे.
सातारकर असल्याचा सदैव अभिमान राहणार

  • मनीषा पाटील,
  • पल्लकड ,केरळ.


सातारा मॅरेथॉन माहिती अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण आहे. शब्दाकन पण सुरेख.
-सौ. प्रतिभा मंजुळे, पुणे

माधुरी ताम्हणे यांच्या” माध्यम पन्नाशी” भाग ५ वर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.


Wow! Superb! Such an engaging write up! Didi tussi great ho!

  • Harshala Shastri


किती छान लिहिलंय माधुरीने.
मुलाखत घ्यायची म्हणजे खरंच खायचं काम नाही. खोल अभ्यास हवा.

  • शर्मिला रणदिवे

    माध्यम पन्नाशी भाग पाच हा माधुरी ताम्हणे यांचा लेख मनोरंजक आणि उद्बोधक आहे.

ऋजुता गर्जे यांचे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा! परिवाराचा पाठिंबा ही खूप महत्त्वाची बाब आहेच. ऋजुता !तुम्ही लकी आहात.
-राधिका भांडारकर, पुणे.


छान अनुभव मांडलाय

  • आलोक खोब्रागडे निर्माता, दूरदर्शन केंद्र


माध्यम पन्नाशी मधील तुझ्याबद्दल ची माहिती वाचली आणि तुझे चतुर:स्त्र व्यक्तीमत्व तू कसे घडवलेस त्याची कल्पना आली.
आणि तुझ्याबद्दल जास्तच respect वाटायला लागला.
अगं तुझ्या समोर मी म्हणजे फक्त एक ex New Indian . -नीलिमा पाणसरे, दादर


Wow!! So beautiful! Didi you are amazingly versatile personality!

  • swapna sankhye

    माधुरी ताम्हणेंचा अतिशय प्रामाणिकपणे निवेदिलेला लेख आवडला.त्यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.
    -सुधाकर तोरणे
    निवृत्त माहिती संचालक
    नाशिक.


मुलाखती म्हणजे केवळ कागदावरील प्रश्न आणि त्यांची साचेबद्ध उत्तरं असा प्रकार नसतो. तर तो दोन व्यक्तींमधलं ह्यदगत जाणून घेत, संवाद साधण्याचा प्रवास असतो. समोरच्या व्यक्तीच मनोगत जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्या विषयाचा अभ्यास तर हवाच. पण अशा संवादासाठी, समोरच्या व्यक्तीच्या मनाचा तळ गाठण्यासाठी मुलाखत घेणाऱ्याचा दृष्टिकोन निखळ, आत्मलक्षी असायला हवा. तसंच समोरच्या व्यक्तीच्या मनाशी संवाद साधण्यासाठी अत्यंत ऋजु संवेदनशीलता हवी. मग विषय कितीही क्लिष्ट आणि तात्विक असला तरी श्रोत्यांपर्यंत /वाचकांपर्यंत तो अचूक पोहोचवता येतो
माधुरी ताईंच्या भाग 5 व्या मधील हे वाक्य पटते..
काही मुलाखती अक्षरशः प्रश्नोत्तराच्या स्वरूपाच्या असतात…मुलाखतकाराने समोरच्याला बोलते करणे महत्वाचे.आनंद झाला लेख वाचून.

  • स्वाती वर्तक, मुंबई.

आपले इंग्लंड मधील नवे लेखक श्री श्रीकांत पट्टलवार यांच्या “मोदक कुणाचा?” या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया….


मोदक कुणाचा?”
छान लिखाण केलं आहे त्यांनी.

  • प्रियांका जगताप शिंदे
  • कॅनडा.


मोदक कुणाचा? काल्पनिक संवाद पण वास्तवावर आधारलेला संवाद आहे.
सुंदर🙏.

  • संगीता मालकर
  • कोपरगाव


पट्टलवारांचा लेख मोदका इतकाच गोड.

  • प्रा सुनीता पाठक
  • छ्त्रपती संभाजीनगर

“आदर्श सून आदर्श सासर”
प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया…


खूप मनापासून अभिनंदन अरुणा ताई.‌.💐👏आ.भुजबळसरांनी सासुसून व कुटुंबातील सगळे जेव्हा एकत्रित विचार करून एकमेकांच्या प्रगतीला खीळ न घालता,प्रगगतीपथावर पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात,हे आपल्या आदर्श कुटुंबाचे उदाहरण खूप सुंदर सादर केले.अभिनंदन
भुजबळ सरांचं.
आपल्या सूनेला सौ.ऋतुजाला पुढील यशस्वी भवितव्यासाठी मन: पूर्वक शुभेच्छा!💐👏🎊🎉✍️🌈
आता पूर्वीचा तो काळ राहिला नाही, एकमेकांना समजून घेऊन वागतात हे आनंददायी आहे.👍🌹

  • अरुणा दुद्दलवार
    दिग्रस, यवतमाळ


आदर्श सून, आदर्श सासर- वाचतांना खूप छान वाटलं . नाती अशी असायला हवीत.
देवेंद्रजी, आपल्याही सदर लेखनाचा अतिशय छान उपयोग झाला.👍

  • अनुजा बर्वे,मुंबई.


माध्यम पन्नाशी भाग पाच
हा माधुरी ताम्हणे यांचा लेख मनोरंजक आणि उद्बोधक आहे.

ऋतुजा गर्जे यांचे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा! परिवाराचा पाठिंबा ही खूप महत्त्वाची बाब आहेच. ऋतुजा!तुम्ही लकी आहात.
-राधिका भांडारकर पुणे.

गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानविण न होई सन्मान. शिक्षक दिनाच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा.

  • विलास प्रधान, मुंबई.

माझी जडणघडणभाग १४ अभिप्राय…


छान आठवणींचा लेख!
-उज्ज्वला सहस्त्रबुद्धे ,पुणे.


अख्खा धोबीआळीतला गणपती उत्सव जसाच्या तसा डोळ्यांसमोर उभा राहिला.
आरती नचनानी ठाणे.


अगदी अख्खी आळी डोळयासमोर आली.
खरच रम्य होतं ते बालपण.
अंजोर चाफेकर. गोरेगाव मुंबई,


राधिका ताई ,
अतिशय सुंदर गणपतीचं वर्णन.. तांदुळाचा गणपती असतो हे आज प्रथमच कळलं.. काही काही गोष्टींची नावे किंवा काही काही रीत भात आज कळल्या .. संपूर्ण लेख वाचताना असं वाटलं तुमच्यासोबत मी सुद्धा गणपती म्सोहळ्यात सहभागी झालेले आहे..अतिशय सुंदर.. तुमच्याकडे खूप छान शब्द भांडार आहे.. खूप सगळ्या नवीन नवीन गोष्टी जाणायला मिळतात.. खूपच छान लेख.. गणपती बाप्पा मोरया
-मानसी म्हसकर. अहमदाबाद.


खूप छान, as usual.
-वंदना जोशी .पुणे


जडणघडण भाग 14 वाचला. छान आहे. त्या काळात गणपती उत्सव साधासरळ होता त्याचे तुम्ही बारकाईने केलेले वर्णन छान उतरले आहे.
-पुरुषोत्तम रामदासी ,मुंबई.


छान, मस्त वर्णन बाप्पांच्या सोहळ्याचे.👌👌
-छायाताई मठकर पुणे वाकड


राधिका..
तुझा जडणघडणीचा हा पण भाग खूप आवडला.. पण खरं सांगायचं तर मुंबईमधील गणपती उत्सवाचे वातावरण आणि पुण्यातील वातावरण याच्यात सांस्कृतिक दृष्ट्या मला खूपच फरक वाटला!! पुण्यामध्ये सार्वजनिक गणपतीचे खूप प्रस्थ असते पण तिथे आम्हाला जायला कधीच परवानगी नव्हती..
खरं म्हणजे आमच्या घराच्या चौकातच मोठा गणपती बसत असे.. पण आम्ही कधी असे जात नव्हतो.. पण आमच्या लहानपणी रात्रीच्या वेळेला सार्वजनिक गणपती समोर कार्यक्रम खूप व्हायचे!! ज्यामध्ये नाच, गाणी, मेळे, सिनेमा असे खूप काही असायचे आणि ते आम्ही लहानपणी खूप एन्जॉय केले.. त्यावेळेला पुण्यातील वातावरण खूप भारावलेले असायचे!! आमच्या शेजारीच केसरी ऑफिस होते व तेथे लोकमान्य टिळकांचे घर होते व त्यांनी बसवलेला पहीला गणपती व त्याचा उत्सव हा एक फारच सुरेख प्रकार असायचा!! हा पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक गणपती समजला जातो आणि त्या वेळेला केसरी ऑफिसमध्ये संध्याकाळी आणि रात्री सुद्धा अतिशय सुंदर भाषणे, परिसंवाद ,गाण्याचे कार्यक्रम इत्यादी खूप छान असायचे.. ते सर्व कार्यक्रम अटेंड करणं हा सांस्कृतिक दृष्ट्या फार सुंदर अनुभव असे जो पुण्यात राहूनच अनुभवायला मिळाला,, आमची जडणघडण थोडीफार त्यामुळे अशा प्रकारची झाली आणि तुझा लेख वाचल्यानंतर तुझे गणपतीतले लहानपणचे वातावरण वर्णन केले आहेस ते मात्र आम्ही कधीच अनुभवले नाही ..अर्थात ते पण वाचताना खूप छान वाटले आणि आपल्याला पण ते अनुभवता आले असते तर खूप मजा आली असती असे पण वाटून गेले!! अर्थात प्रत्येक गावचा एक वेगळाच भावनिक ,धार्मिक, आणि सांस्कृतिक असा सामाजिक चेहराअसतो ज्याच्याचमुळे आपलं लहानपण आणि मानसिक जडणघडण होत असते..
तुमच्या घरचा तांदुळाचा गणपती आणि त्यावेळेस तू वर्णन केलेलं वातावरण खूपच आवडले ..विशेषतः तुझे बाबा ज्या भक्ती भावाने हे सर्व करत होते ते सर्व डोळ्यासमोर उभे राहिले !!फार सुंदर भाषेत तू हे वर्णन केले आहेस.? त्यासाठी खास अभिनंदन..
-सुचेता खेर. पुणे.


हा भाग वाचताना.…
वक्रतुंड महाकाय
मूर्ती दिसे साजरी
गणराया आगमन
माझ्या घरी
दहा दिवस घरी रहावे
शांतीसुख आमचे बघावे
चिंता क्लेश दूर करावे
आनंद चराचरी

गणराया आगमन , प्रतिष्ठान
मन प्रसन्न करुन गेला.
-अरुण पुराणिक ,पुणे

१०
Radhika, your stories r so true to life. I feel as if I am reading an episode of my life. संम्पेपर्यत ठेवतात येत नाही. Really good.👏👏👏
-संध्या जंगले, मुंबई.

११
Chan nice description of Ganpati pujan at yr place Never seen Tandalacha Ganpati
-जयश्री कोतवाल,पुणे

१२
साधे आणि बहुतेक सर्वांच्या अनुभवाचे प्रसंग किती छान रंगवलेस. खूप छान.
-प्रमोद शृंगारपुरे. पुणे.

इतर मजकुराविषयीच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.


श्रीसुभाष कासार ,
डाॅ. अनुराधा पाटील या दोघांच्या रक्षाबंधना वरील कविता भावपूर्ण आहेत.
सुधाकर तोरणे यांनी
“स्वप्न पहा उघड्या डोळ्यांनी” या पुस्तकाचा परिचय योग्य शब्दात मांडला आहे.हे पुस्तक नक्की वाचेन.

मी शिल्पा….या पुस्तक प्रकाशनाचा वृतांत वाचताना डोळ्यासमोर घडते आहे याचा प्रत्यय आला

माधुरी ताम्हणे यांचे “माध्यम पन्नाशी” वाचताना रंगून गेले
अत्यंत ओघवती भाषा

“ज्येष्ठांचा संवाद” अनुजा बर्वे यांनी बोलक्या शब्दात मांडला

चित्रा मेहेंदळे यांच्या आठवते आज फुलनदेवी,आणि कान्हा कधी येशील तू? या कवितेतून वास्तवतेचे दर्शन झाले

सिध्दहस्त लेखिका यांचा परिचय संगीता कुलकर्णी यांनी नेमक्या शब्दात मांडला आहे.

देव कि विज्ञान ” ज्येष्ठ कनिष्ठ”
नेमक्या शब्दात व्यक्त झाले.

देवेंद्र मी 23 तारखेला san francisco ला आले आहे.
इकडे न्युज स्टोरी टुडे वाचताना वेगळाच आनंद मिळतो. विविध विषयांवरचे लेख,पुस्तक परिचय, कविता, व्यक्तिचित्र, कथा,कविता असे अनेक साहित्य प्रकार वाचनाची पर्वणीच जणू .
अनेक लेखक ,कवी यांचा परिचय झाला.
“न्युज स्टोरी टुडे “वाचताना दूरदेशी रमून जाते .
आपण मला या समूहात सहभागी करून घेतले याबद्दल
खुप धन्यवाद .
-शुभदा डावरे चिंधडे,अमेरिका


“स्वप्न पहा उघड्या डोळ्यांनी” या सकारात्मक मार्ग दाखवणाऱ्या पुस्तकाचं सकारात्मक रित्या केलेलं विवेचन! तोरणेसर, आपलं मनापासून कौतुक. तरुण पिढीला अति उपयोगी सल्ला देणारं पुस्तक वाचायलाच हवं.
-डॉ.विनायकराव भावसार, मंडी,(हि.प्र.)


“सायबर फसवणूक कशी टाळाल?” हा खूप छान माहितीपूर्ण लेख आहे. एका अतिशय उत्तम कार्यक्रमाचा अतिशय सुंदर आढावा घेऊन आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद .फसवणूक कशी टाळाल?” हा खूप छान माहितीपूर्ण लेख आहे. एका अतिशय उत्तम कार्यक्रमाचा अतिशय सुंदर आढावा घेऊन आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

  • मृदुला राजे
  • जमशेदपूर.

शिक्षक दिनानिमित्त लिहिलेल्या कविता खूप सुंदर.

माधुरी ताम्हणे यांचा माध्यम पन्नाशी अनुभव बर्‍याच गोष्टींवर प्रकाश टाकणारा. हेच अनुभव पुढे आयुष्यभर उपयोगी पडतात.

हलकं फुलकं मधील अनुजा बर्वे यांची खिरापत खूप आवडली. नक्कीच त्यांच्या पध्दतीने करून बघणार आहे.
-अरुणा गर्जे,नांदेड


गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानविण न होई सन्मान. शिक्षक दिनाच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा.

  • विलास प्रधान, मुंबई.

  • — टीम एन एस टी. ☎️ 9869484800
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

वैशाली कोंडाजी on “माध्यम पन्नाशी” : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” : ९