मनात मन हे गुंतत जाते
ते प्रेमाचे नाते असते
वीण असावी साधी सोपी
नको व्हावया गुंता तेथे
नेत्र थकावे वाट पाहुनी
ओढ असावी अंतर्यामी
निःशब्दांची कोमल भाषा
सहज कळावी हृदया-हृदयी
डोळे भरुनी तिला पाहता
नयन तयाचे भारुन जावे
लोचनातले स्वप्नभावही
पापणीवरी दाटुन यावे
सुखदुःखांचे घेउन धागे
वस्त्र विणावे विश्वासाचे
उत्कट, सुंदर भाव प्रितीचे
टिकविल नाते मनामनाचे
— रचना : सुरेश शेठ. कोथरूड, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800