आपल्या न्यूजस्टोरीटुडे या वेबपोर्टल वर दर गुरुवारी, वेश्यांची मुलं:त्यांच्या समस्या आणि उपाय या ज्वलंत विषयावर “लालबत्ती” या मथळ्याखाली अत्यंत संवेदनशील लेखन करणाऱ्या डॉ राणी दुष्यंत खेडीकर यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कर्नाटक राज्य सरकार शिक्षक संघ (एल), एजुकेशन हेल – लाइन चैरिटेबल ट्रस्ट शिक्षक सदन, बैंगलोर केम्पेगौड़ा रोड, बैंगलोर यांच्या द्वारे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
डॉ. राणी खेडीकर या बालमानसतज्ञ असून पालकत्व विषयावर त्यांनी राज्यभरात अनेक व्याख्याने दिली आहेत. राणीजींनी समाजातील उपेक्षित, शोषित वेश्यांच्या लहान मुलांवर पीएचडी मिळवली आहे. त्या मुलांचे आयुष्य किती असुरक्षित असते, त्यांना कोण कोणत्या अडचणींना सामना करावा लागतो या सर्वांचा विचार त्यांनी आपल्या अभ्यासात केला होता. पुढे त्यांनी या विषयाला वाहून घेतले. या वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.
आज ही मुले मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. अशाप्रकारे या मुलांमध्ये डॉ राणी खेडीकर यांनी अमुलाग्र बदल आणला आहे. तसेच त्या काही शिक्षक संस्थांशी संबधित आहेत. त्यांनी कविताही लिहिल्या आहेत. त्यांचे अनेक लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असतात, ‘लाल दिव्याच्या वस्तीवर‘ या विषयावर त्यांनी एक कथासंग्रह प्रसिद्ध केला आहे. यासोबतच त्यांनी लघु पटांचे निर्मिती कार्य सुरू ठेवले आहे. त्यामधून शिक्षणाविषयीचे कार्य पुढे जात असते. म्हणून त्यांना हा सावित्रीबाई फुले पुरस्कार दिला गेला.
या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपाध्यक्ष श्री श्री वनकल्लु मल्लेश्वर विद्यालय, श्री श्री श्री बसवा रामानंद महा स्वामीजी, कर्नाटक सरकारचे ज्येष्ठ प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षा मंत्री, डबसपेट, श्री श्री पट्टादा शिवानंद शिवाचार्य महास्वामी श्री चिक्कल्लू बालू मठ श्री.बी.सी. नागेश माननीय पूर्व मंत्री, श्री.कृष्णाय्या श्री.कृष्णाय्या शेट्टी प्रसिद्ध फिल्म अभिनेत्री अमृता अयंगर चैरिटेबल एकाउंटेंट, कोलकाता अध्यक्ष पृथ्वीराज वी., कर्नाटक राज्य प्रधानाध्यापक शिक्षक संघ, एक्ष कृष्णप्पा, अध्यक्ष, कर्नाटक राज्य ग्रामीण शिक्षक संघ, श्री अशोक सज्जन, चैरिटेबल एकाउंटेंट, डॉ. भास्कर, उपस्थित होते. संपूर्ण कार्यकारिणी, आणि आयोजक यांच्या अथक प्रयत्नांनी इतका भव्य सोहळा यशस्वीरित्या पार पडला.
पुस्तक प्रकाशन
या पुरस्कार सोहळ्याआधी, वर्ष अखेरीस डॉ. राणी दुष्यंत खेडीकर यांच्या संवेदनशील पुस्तकाचे प्रकाशन वाचक दिनी संपन्न झाले. दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्र आणि कीर्ती महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालीचा हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. अनुवाद, कथा, कविता, विचार, विज्ञान अशा विचारधारांची सर्व पुस्तके एका व्यासपीठावर प्रकाशित झाली. प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख वक्ते या नात्याने मा. डॉ. बाळ फोंडके, मा. डॉ. अविनाश सुपे, मा. संजीवनी खेर, मा. राजीव श्रीखंडे हे अतिथी समारंभाच्या व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ. राणी खेडीकर यांच्या ‘लाल दिव्याची वस्ती आणि निष्पाप बालपण’ या विशेष कथासंग्रहाचे प्रकाशन झाले.
“वेश्यांची मुलं आणि समस्या” या त्यांच्या कार्यावर हा कथासंग्रह आहे. ‘वेश्या वस्तीत जगत असताना निष्पाप मुलांच्या डोळ्यात भविष्याची सुंदर स्वप्न रंगत असतात. ती स्वप्न नेमकी कशी असतात. ती स्वप्न पूर्ण करताना वास्तव परिस्थितीशी त्यांना कसे झुंजावे लागते. या सर्व कथा ह्या संग्रहात वाचकांसाठी बंदिस्त झाल्या आहेत.
हा विषय अतिशय संवेदनशील आहे, तरी ग्रंथालीच्या श्री सुदेश हिंगलास्पूरकर यांनी या सर्व कथांना प्रकाशित करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले. या संवेदनशील कथांना समृध्दीताई पोरे यांनी तेवढेच सखोल प्रस्तावना लिहिली आहे. कथासंग्रहाच्या मलपृष्ठावर साहित्यिका डॉ. विजया वाड आणि अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी शुभेच्छा पर संवाद शब्दबद्ध केले आहेत. तसेच सी आय एस एफचे डी आय जी श्री मनोज कुमार शर्मा यांचेही मनोगत आहे.
या मनोवेधक कथा संग्रहाचे मुखपृष्ठ राणीजींची मुलगी देवश्री खेडीकर हिने चितारले आहे.
लेखिका डॉ. राणी खेडकर यांनी आपल्या मनोगताच्या शेवटी त्यांचे पती डॉ दुष्यंत खेडीकर आणि आपल्या सर्व सहाय्यकांचे आभार मानले. सोहळ्यादरम्यान या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अविनाश सुपे यांनी केले.
लेखिका डॉ. राणी खेडीकरांच्या या अमूल्य कार्याचा आढावा, आपण सर्वांनी या पुस्तकातून घ्यावा व संवेदनशील मनाने लेखिकेचे स्वागत करावे. असे आवाहन युवा साहित्यिक अँड. रुपेश पवार यांनी केले आहे.
डॉ राणी खेडीकर यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल तसेच त्यांच्या पुस्तक प्रकाशनाबद्दल न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा💐

– देवेंद्र भुजबळ. 9869484800
अभिनंदन !!! डॉ. राणी खेडेकर madam! पुढे येणाऱ्या लेखनास खूप खूप शुभेच्छा!
लाल बत्ती. डॉ. राणी दुष्यंत खेडीकर यांना सलाम 🙏💐🌹🥇🥇
अभिनंदन