निवृत्त अतिरिक्त महासंचालक भगवंतराव मोरे यांची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्यपदी नुकतीच फेरनियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ही नियुक्ती केली आहे.
अल्प परिचय
भगवंतराव मोरे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील
संगमनेर तालुक्यातील वडगाव पानसे येथील आहेत. १९७८ मध्ये पोलीस दलात सरळसेवा अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली.१९८०-८४ या काळात मिरज (जि. सांगली) येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
कोल्हापूर येथे कार्यरत असताना बेळगाव येथील बनावट नोटा छपाईचे रॅकेट चव्हाट्यावर आणून त्यांनी कुख्यात म्होरक्यांना बेड्या ठोकल्या होत्या. सोलापूर येथे पोलीस आयुक्त, औरंगाबाद, कोल्हापूर येथे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून कार्याचा ठसा उमटविला. त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेण्याससाठी त्यांनी नेहमीच काळजीपूर्वक काम केले.
महाराष्ट्र राज्य पोलिस दलाच्या महासंचालक पदावरही ते कार्यरत होते. केंद्र सरकारमार्फत त्यांची इंग्लडला प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. पोलीस दलातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्यपदी सलग दुसऱ्यांदा नियुक्ती केली आहे. या पदाला उच्च न्यायालयाच्या जज्ज पदाचा दर्जा आहे.
या फेर नियुक्ती बद्दल श्री मोरे यांचे विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक, सहकारी, औद्योगिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
– टीम एनएसटी. 9869484800
🌹अभिनंदन 🌹