महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस 2 जानेवारी रोजी असतो. या निमित्ताने पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते मदन रामनाथ लाठी यांनी वायसीएम हॉस्पिटल मध्ये वयाच्या 62 व्या वर्षी 77 वे रक्तदान केले. यापूर्वी त्यांनी देशसेवा म्हणून 76 वेळा रक्तदान केलेले आहे.
श्री मदन लाठी यांनी या विषयी बोलताना सांगितले की, देश सेवा व सर्व सामान्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस
रात्रंदिवस, ऊन वारा पाऊस व स्वतःचे संरक्षण अशा कशाचीही पर्वा न करता उभे असतात.
त्यांच्या उपकाराची जण ठेऊन त्यांच्या पुढील वाटचालीस आपण कुठलाही हातभार लाऊ शकत नसलो तरी त्यांचे हसतमुखाने फुल ना फुलाची पाकळी देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत.
श्री लाठी हे अश्याप्रकारे देश भक्त, थोर व उच्च पदस्थ व्यक्तींच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणे, तसेच रक्तदान करण्याचा छंद जोपासला आहे.
– टीम एनएसटी. 9869484800
थोर समाजसेवक मान.श्री.मदन लाठी
यांचं वय ६२, रक्तदान मात्र केलं चक्क ७७ वेळा
देशभक्त मदनभाऊंनी फुलवला
प्रेम सेवा त्याग भक्तीचा मळा
त्यांच्या मनोगतातून दिसून येतो
पोलिसांबद्दलचा कळवळा
सदैव तत्पर असतात मदनभाऊ
दीन दुःखितांच्या मदतीला
थोरा मोठ्यांच्या कार्याची जाणीव
नेहमीच ते ठेवतात
वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन
कृतज्ञ भाव व्यक्त करतात
मनापासून करतो मी
मदनभाऊंचं अभिनंदन
प्रभूकृपेने फुलत राहो
त्यांच्या जीवनाचं नंदनवन
राजेंद्र वाणी, दहिसर, मुंबई 🙏🌹