Thursday, June 19, 2025
Homeसाहित्यअशी असावी मैत्रीण

अशी असावी मैत्रीण

मैत्रीण हवी दारावरील उंबरठयासारखी ,
दुःख अडवून ह्रुदयी लावण्यासारखी ॥

मैत्रीण हवी गोठ्यातील गाईसारखी ,
मनाला बिलगून चाटणाऱ्या वासरासारखी ॥

मैत्रीण हवी लुकलुकणाऱ्या चांदण्या सारखी ,
अमावास्येला चंद्राला अवकाशात लपवण्यासारखी ॥

मैत्रीण हवी तटस्थ झाडासारखी ,
रणरणत्या उन्हाळ्यात सावलीच्या गारव्यासारखी ॥

मैत्रीण हवी डोळ्यात राहण्यासारखी ,
काजळ होऊन तीट लावण्यासारखी ॥

मैत्रीण हवी सुगंधित फुलासारखी ,
बंद कुपीतल्या आनंदी मनासारखी ॥

मैत्रीण हवी सतत वाचण्यासारखी ,
पाने चाळताना भूतकाळी आठवणीसारखी ॥

मैत्रीण हवी धनुष्य तीरासारखी ,
मनातील भावनांना अचूक ओळखण्यासारखी ॥

वर्षा भाबल.

– रचना : सौ. वर्षा भाबल.
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

9 COMMENTS

  1. खरोखरच मैत्रिणीचे वेगवेगळे पैलू तू इथे उलगडत छान कविता रचलीस आणि अशीच एक तुझ्यासारखी मैत्रिण आम्हाला लाभली याचा आम्हाला अभिमान वाटतो.

  2. वर्षा अशाच कविता करत रहा .खूप छान खूप शुभेच्छा 👌👌

  3. खूप छान कविता, आज पर्यंत मित्रांवर सुरेख भाष्य करणारे लेख, कविता खूप वाचल्या आणि ऐकल्यासुद्धा…पण मैत्रिणीवर केलेल्या कविता आणि लेख क्वचितच वाचायला आणि ऐकायला मिळतात…
    मोरपिसाच्या हळुवार स्पर्शाने जसे अंग मोहरून जाते ना, अगदी तसेच आज तुमच्या या कवितेत दाखविलेल्या मैत्रिण या शब्दाबद्दलच्या विविध छटांनी मन अगदी मोहरून गेले…
    वर्षा मॅडम, असेच नवनवीन लेख आणि कविता करीत रहा..
    तुमच्या कविता आणि लेख वाचताना तुमच्या सहवासाची, मायेची ऊब नेहमी जाणवते…आम्ही सर्व विद्यार्थी तुमच्यावर खूप खूप प्रेम करतो..We all love u..Varsha Madam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?
शितल अहेर on पुस्तक म्हणाले…
सौ. सुनीता फडणीस on पुस्तक म्हणाले…
श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…