नोकरीपेशा समजल्या जाणाऱ्या मराठी माणसात उद्योजकता वाढीस लागावी या उद्देशाने जागतिक पातळीवर काम करीत असलेल्या अमेरिका स्थित गर्जे मराठी या संस्थेचा सहावा वर्धापन दिन मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात शानदारपणे साजरा झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अणूऊर्जा शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर, आयएएस अधिकारी अश्विनी भिडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ काकोडकर यांनी प्रत्येक गाव हे निर्यातक्षम झाले पाहिजे, मूलभूत संशोधनावर भर दिला पाहिजे असे प्रतिपादन केले. तर श्रीमती अश्विनी भिडे यांनी महिला सक्षमीकरण वरकरणी न होता ते सूक्ष्मपणे होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांच्या हस्ते गर्जे मराठी च्या महिला उद्योजकता उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह संस्थापक सुधीर ब्रह्मे यांनी केले. तर संस्थापक श्री आनंद गाणु यांनी आता पर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेऊन भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. आभार प्रदर्शन उद्योजिका मीनल मोहाडीकर यांनी केले. तर सूत्र संचालन शिबानी जोशी यांनी केले.
या कार्यक्रमास उद्योग जगतातील विविध मान्यवर, गर्जे मराठी चे हित चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा संपूर्ण वृत्तान्त आपण पुढील लिंक वर पाहू शकता.
– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खुप छान ,,मराठी वर्धापणदिन सचित्र लेख 👌👌👌
अभिनंदन. छान उपक्रम.
🌹खूप छान उपक्रम 🌹
धन्यवाद सर