१५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिवस भारतातील सर्व नागरिक आणि त्याच बरोबर भारताबाहेर राहणारे भारतीय देखील उत्साहात साजरा करतात. त्यात यंदाचा स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सवी असल्याने आनंदाला, अभिमानाला उधाण आले होते.
भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना 400 वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. यामध्ये सामायिक हितसंबंधांच्या अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.
नेदरलँड्समध्ये काल भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा केल्या गेला. सुमारे 500 भारतीय डायस्पोरा सदस्य “इंडिया हाऊस” वासेनार, नेदरलँड्स या राजदुतांच्या निवासस्थानी जमले होते.
भारताच्या राजदूत श्रीमती रिनत संधू यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर राष्ट्रगीत गायन आणि राष्ट्रपतींचे अभिभाषण वाचून या उत्सवाची सुरुवात झाली.
स्वातंत्र्य दिनाच्या या समारंभात श्रीमती संधू यांनी AKAMQuiz 2022 च्या विजेत्यांचा सत्कार केला. यानंतर शास्त्रीय आणि देशभक्तीपर नृत्य आणि गाणी सादर करण्यात आली. स्वादिष्ट भारतीय स्नॅक्सने कार्यक्रमाची लज्जत आणखीनच वाढवली.
खरोखरच हा स्वातंत्र्य दिन अविस्मरणीय ठरला.

– लेखन : प्रणिता देशपांडे. नेदरलँड्स
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800