महाराष्ट्रातील ज्या बालकांच्या आई वडिलांचं किंवा त्यांच्या घरातील कमावत्या व्यक्तीचं कोरोनाने निधन झाले असेल तर अशा निराधार मुलांच्या शिक्षणाचा खर्च सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जे.एम.फायनान्शियल कंपनी करणार आहे.
अशा निराधार बालकांचे बारावी पर्यंतचे शिक्षण, भोजन, निवास, आरोग्य यावर होणारा खर्च मदतीत अंतर्भुत आहे. अशा जवळपास १ हजार बालकांना मदत देण्यात येईल.
तरी आपल्या माहितीतील अशा बालकांचे नाव, वय, कौटुंबिक तपशील, पत्ता, संपूर्ण क्रमांक, पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र, आधार कार्ड, आदी माहिती व कागदपत्रे जे. एम. फौंडेशन, सी. एस. आर. टीम यांच्या नावे dharmesh.gohel@jmfl.com या ईमेलवर पाठविण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी कंपनीच्या प्रतिनिधींकडून प्रत्यक्ष भेट देऊन करण्यात येईल.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वर चार लेख उत्कृष्ट
विषयांची विविधता पहायला मिळते
खूपच सुंदर आणि स्तुत्य असा हा उपक्रम आहे. जेएम फायनान्शिअल कंपनीचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. या corona महामारीने कित्येक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. कित्येक बालकांचे छत्र हरपले आहेत अश्या निराधार मुलांना या कंपनी च्या उपक्रमातून मायेच्या ओलावा आणि त्यांचे शिक्षण चालू राहायला मदतीचा हात मिळत आहे फारच दिलासा दायक आहे असं मला मनापासून वाटते. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि त्रिवार तुमचे अभिनंदन