आई म्हणजे परमेश्वराचे दुसरे रूप
आई म्हणजे परमेश्वराचे दुसरे रूप
जशी वृक्षाची अखंड सावली
तशी ही माझी माय माऊली
निरंतर वाहणारा प्रेमाचा लळा
तिच्या मांडीवर निजताच
भासते स्वर्ग सुख
अशी ही माय माऊली
परमेश्वराचे दुसरे रूप
कितीही मोठे झालात तरी
असते तिची जादुई उब
आईसाठी मुले कायम
लहानच असतात
मुलांच्या चूका त्याना
समजावून माफ केल्या जातात
असाल भले तुम्ही करोडपती
विकत नाही घेता येत हे सुख
अशी ही माय माऊली
परमेश्वराचे दुसरे रूप
आपला चेहरा पाहून
मन ओळखते
अशी किमया तिच्या मायेत असते
सतत आपल्या मुलांच्या
प्रगतीसाठी झटत ती असते
कितीही त्रास झाला तरी
सांगत कोणाला नसते
आपले प्राण देखील
मुलांसाठी देऊ शकते
मुलांमध्ये तिचे सर्व विश्व
सामावले हो असते
अशी ही माय माऊली
परमेश्वराचे दुसरे रूप
ती जगत असते फक्त
आपल्या मुलांसाठी
सतत सांभाळत असते
त्याचा आवडी निवडी
आपली मुले भविष्यात
खूप खूप मोठी व्हावीत
एक आदर्श व्यतिमत्वाची
उदाहरण असावीत
अशी सदैव मनोकामना करते
अशी ही माय माऊली
परमेश्वराचे दुसरे रूप
जेंव्हा कधी आपल्या मुलांचे
कोणी कौतुक करतात
तेंव्हा तिच्या डोळ्यात
आनंदाश्रू तरंगतात
मुलांवर चांगले संस्कार घडावे
एवढिच निरागस इच्छा असते
त्याच्या सुखात तिचे
सुख सामावले असते
त्याच्या दुःखात ठामपणे
पाठीशी उभी ती राहते
अशी ही माय माऊली
परमेश्वराचे दुसरे रूप
मुलांना सावरायला
सदैव तत्पर ती राहते
छोट्या छोट्या गोष्टीना
घाबरणारी ती
मुलांसाठी मोठे वादळ
अंगावर घेऊ शकते
कोठून तिच्यात ही
अद्भुत शक्ती येते
त्या परमेश्वराला देखील
माहीत नसते
अशी ही माय माऊली
परमेश्वराचे दुसरे रूप
मुलांना मारून जवळ घेते
स्वतःही मुलांसोबत रडत राहते
कितीही रागावली तरी
मायेची ज्योत तेवत राहते
आपल्या मुलांना सुखी ठेव
एवढीच परमेश्वराला
प्रार्थना करते
स्वतःसाठी कधी ती जगते?
अशी ही माय माऊली
परमेश्वराचे दुसरे रूप.
नवस बोलते मुलांसाठी
प्रार्थना करते त्याच्या
उज्वल भविष्यासाठी
मुले जेवलीत की पोट तिचे भरते
आपली मुले यशस्वी
होताना ती जेंव्हा पाहते
अभिमानाने उर तिचा भरतो
प्रत्येक संकटावर मात
करण्याची हिंमत देते
अशी ही माय माऊली
परमेश्वराचे दुसरे रूप!
जशी असते विठ्ठलाची तुळस
तशी आई असते मायेचा कळस
तिला कधीही अंतर देऊ नका
जन्मभर तिची सेवा करा
तिच्या आशिर्वादाचा लाभ घ्या
पुण्याच्या संचय करून ठेवा
ज्याच्या जवळ असते आई
त्यांना कशाचीही कमी नाही
रचना – रश्मी हेडे.
श्री.सुधाकर करवंद यांचा लेख वाचताना मी खरेच माझ्या बालपणीच्या विश्वात गेले. आम्ही सर्व लहान मुले तेव्हा गावाला आत आत करवंदाच्या जाळीत घुसून टोपली भर करवंदे गोळा करत असू, तेव्हा तो चीक आमच्या पूर्ण अंगाला आणि काटेकुटे सर्व शरीराला टोचत असत, पण तरीही आम्ही करवंदे काढण्याचे काही थांबवत नसू. काळीभोर करवंदे आणि हिरवीगार करवंदे आठवूनच तोंडाला पाणी सुटतं आहे.