“कायदा आणि सुव्यवस्था- नागरिकांची जबाबदारी आणि पोलिसांची भूमिका” या विषयावर एस.एन.डी.टी विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाच्या तसेच आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.भूषण बेलणेकर तसेच पोलीस निरीक्षक श्री. माने व पोलीस उपनिरीक्षक श्रीमती खरचे मॅडम यांनी सुरक्षेसंदर्भात विशेष सत्र घेतले.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांची भूमिका तसेच नागरिकांची कर्तव्ये, महिला व बालक सुरक्षा या विषयावर चर्चा केली. विद्यार्थिनींना सायबर सुरक्षा या विषयावर कानमंत्र दिला.
तसेच भारतरत्न महर्षी कर्वे ज्ञान स्त्रोत केंद्रास सदिच्छा भेट दिली. संचालक प्रा.डॉ.सुभाष चव्हाण यांनी संपूर्ण विभागाची माहिती दिली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थिनीं सोबत संवाद साधला. भविष्यात असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतील असा मानस मा.संचालक प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांनी व्यक्त केला.
महिला व मुलींवर अत्याचार होऊ नयेत म्हणून त्यांनी स्वसंरक्षणाचे तंत्र आत्मसात करणे ही काळाची गरज बनली असून इतरही शाळा, कॉलेजेस ने असे उपक्रम हाती घेतले पाहिजेत.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800