Sunday, December 22, 2024
Homeलेखकोरोना : शेजाऱ्यांची अमूल्य साथ

कोरोना : शेजाऱ्यांची अमूल्य साथ

कोरोनाच्या मोठ्या संकटावर मात करून आमचे कुटुंबीय सुखरूप परत आले आहे.या तणावाच्या काळामध्ये सगळ्यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केलं.
परंतु यामध्ये न्यायाधीश बंधू श्री.विक्रमसिंह भंडारी साहेब यांनी खूप मोलाची मदत केली.

आरटीपीसीआर टेस्ट करून घेणे, सर्व ब्लड टेस्ट सेंट जॉर्जला करुन घेणे, वेळोवेळी त्याच्या एचआरसिटी स्कॅन करण्यास मदत करणे, पेशंटला ऍडमिट करणे, पेशंटचे रिपोर्ट्स व्हॉट्सॲप वर पाठवणे, रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेहमी ये जा करण्यासाठी योग्य व्यवस्था करणे आणि दररोज एकदा तरी रुग्णाला फोन करून खुशाली विचारणे हे सर्व माणुसकीचा ठेवा जपणारे काम बंधू श्री. भंडारी यांनी केले.

या काळात आमचे शेजारी श्री जयंत डोरले साहेब आणि सौ. हर्षदा डोरले वहिनी (अन्नपूर्णा) यांची खूप मोलाची मदत झाली. श्री.महेंद्र शितोळे शितोळे साहेब व सौ. नम्रता शितोळे वहिनी, श्री अजय लोसरवार साहेब आणि सौ. सुवर्णा लोसरवार वहिनी यांचीही खूप मोलाची मदत झाली. या तिन्ही कुटुंबानी आमच्या रोजच्या जेवणाची सोय केली होती.

आजार ओळखून लगेच २३ एप्रिल ला समन्वयक न्यायाधीश बंधू श्री. विक्रमसिंह ना फोन केला आणि घरीच सर्वाची आर टी पी सी आर टेस्ट केली.
सर्वांची अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली परंतू माझ्या आर टी पी सी आर टेस्टचा निकाल पॉझिटिव आला. आजाराचा स्वीकार करून मी गृह विलगीकरणात गेलो.
लगेच मी फॅमिली डॉक्टर डॉ.अमित अरुण पाटील, एम. डी., दहिवडी (सातारा) यांच्याकडून फोन वरून सर्वकाही ट्रीटमेंट सुरू केली.

उपचार सुरू करण्याकरीता उशिर न केल्यामुळे त्वरित या रोगावर नियंत्रण करता आले आणि सलग पंधरा दिवस योग्य ती औषधे घेतल्यानंतर दोन वेळा त्याच्या सिटी स्कॅन केल्यानंतर मी या आजारातून पूर्ण बरा झालो.

कोरोना टेस्ट करण्याकरीता अजिबात उशीर केला नाही. २३ एप्रिल ला त्याच दिवशी सैफी हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन केले. एच आर सी टी स्कोअर ०/२५ आला.
सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये ५ दिवसांनी तो ५/३५ आला.
आजाराचे गांभीर्य लगेच समजून घेऊन मुंबईमध्ये लोकल डॉक्टर आणि माझे फॅमिली डॉक्टर या दोघांच्या मदतीने सर्व कुटुंबांने आजारावर मात केली.

या आजारामध्ये जर उशीर  केला आणि आपण त्वरित स्कॅन केलं नाही तर, पाचव्या सहाव्या दिवशी स्कोर खूप वाढतो आणि बऱ्याच वेळा आपल्या हाताबाहेर गोष्टी जातात. म्हणून लक्षण दिसली की त्वरित स्कॅन करणे, ब्लड टेस्ट करणे अत्यंत आवश्यक आहे.

या वरील लॅबटेस्ट मी वेळोवेळी केल्या. त्याचा मला शरीरातील विषाणूंची परिस्थिती ओळखण्यासाठी मदत झाली. सोबत रक्त पातळ करणे आणि रक्तात गाठ होण्यापासून थांबण्याची औषधे डॉक्टरांनी त्वरित सुरू केली होती आणि त्याचा फायदा झाला. ऑक्सीजन पातळी कमी होण्याच्या प्रक्रियेस वेळेत थांबविता आले
आणि प्रोनिंग एक्सरसाईझ प्रकारामुळे ऑक्सिजन पातळी वाढण्यास नक्कीच मदत झाली.

सकाळी उठल्यावर बरोबर योगा, पाच ते दहा मिनिटे चालणे, श्वासोच्छवासाचा थोडा व्यायाम याचा नक्कीच फायदा झाला. त्यामुळे मी घरामध्ये उपचार केल्याने बरे झालो.

सौ.सारिकाचा स्कोर आठ असल्यामुळे तिला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. त्या हॉस्पिटलचे डॉ.अडसूळ आणि आमचे मित्र विक्रमसिंह यांनी मोलाची मदत केली.

सात दिवस व्यवस्थित ट्रिटमेंट घेतल्यानंतर सारिकासुद्धा सुखरूप घरी आली. त्यानंतर सारिका आणि मी पुन्हा आर टी पी सी आर टेस्ट केली.ती निगेटिव्ह आली.

लक्षात ठेवा, पहिला आठवडा आपल्या हातात,
दुसरा आठवडा तुमच्या डॉक्टरच्या हातात आणि
तिसरा आठवडा देवाच्या हातात.

आपण स्वत: निर्णय घ्यावा की, आपण आपल्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी काळजीपूर्वक या आजाराशी सामना करायला पाहिजे. डॉक्टरांवर विश्वास ठेवायला हवा, पॉझिटिव्ह विचारसरणी हवी, आपल्या मित्रांशी संवाद हवा, ज्याच्यामुळे चांगल्या अँटीबॉडीज तयार होतील आणि सर्व औषध न चुकता वेळेवर घेणे, योगा करने, नकारात्मक विचार न करणे , मोबाइल वर कमी बोलणे, अजिबात टिव्ही न बघणे, पुस्तकं वाचणे, चांगले चित्रपट पाहणे खूप फायदेशीर ठरते.

मी स्वतः छत्रपती शिवाजी, मुकद्दर, इत्यादी पुस्तक वाचून पूर्ण केली. काही चांगले चित्रपट पाहिले. घरात जय सोबत मस्ती केली, एकदाही नकारात्मक विचार असणार्‍या व्यक्तीशी बोललो नाही, प्रोटीन युक्त आहार घेतला, गृह विलगीकरनणाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले.

तुम्ही तणावग्रस्त असाल तर डोकं शांत ठेवा पण त्याचा परिणाम शरीराच्या काम करण्यावर होतो. जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर २५ पेक्षा जास्त स्कोर असणारी ८० वर्षाची आज्जी सुद्धा या आजारातून बरी झाली आहे.

राजेश खन्ना  “आनंद”  सिनेमात म्हणतो “किसी बडी खुशी के इंतजार में छोटी छोटी खुशियों के मौके खो देते है” या काळात डॉक्टर अमित अरुण पाटील, डॉक्टर उल्हास आवटी, डॉ. अडसूळ (सेव्हन हिल्स) आणि डॉक्टर कपोते, श्री सोमेश् शिंदे, श्री सोनवणे, सैफि हॉस्पिटल ची आरोग्य यंत्रणा, सेव्हन हिल्स हॉस्पिटलची सर्व आरोग्य यंत्रणा, माननीय न्यायमूर्ती श्री सुरेंद्र तावडे साहेब, श्री. वानखेडे साहेब, श्री कोठलीकर साहेब, श्री दिनेश देशमुख साहेब, सौ.सायली दंडे मॅडम, श्री. सतीश पाटील साहेब, श्री महेंद्र जाधव साहेब व सर्व न्यायाधीश परिवार, बालमित्र परिवार, नातेवाईक ई. यांचा ऋणी आहे.

– लेखन : न्या.डॉ.उमेशचंद्र मोरे, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. कोरोना बाबतीत शेजारची अमुल्य साथ या शीर्षकाखाली मदतीचे व्यक्त केलेले विचार आवडले आहेत. शेजाऱ्यांनी खूप मोठी मदत केल्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे. शेजारी हेच खरे आपले जवळचे नातेवाईक असतात असे मला वाटते… सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on अंदमानची सफर : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” १७