शाहिद कपूर, माधुरी दीक्षित, अजय देवगण 2021 मध्ये, OTT या डिजिटल स्पेसमध्ये पदार्पण करत आहेत.
२०२० मध्ये अनेक संधींचा वर्षाव तारे तारकांवर झाला आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी मोठ्या स्क्रीनवरून ओटीटीकडे स्थलांतर केले.
‘द बिग बुल’ मध्ये मनोरंजन करण्यासाठी अभिषेक बच्चन दिसले तर ‘त्रिभंगा’ मधल्या काजोल ने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि मन जिंकले.
गेल्या वर्षी देशामध्ये सिनेमा स्क्रीन बंद पडल्यापासून अनेक तारे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर चमकू लागले आणि यावर्षीही काही तारे मनोरंजक ओटीटी वर डेब्यू करत आहेत.
जुने, नवे सारे जण एक नवे क्षेत्र काबीज करत आहेत, त्यातच आहेत अजय देवगण ते शाहिद कपूर पर्यंत..
– २०२१ च्या आशादायक वेब डेब्यूवर अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
ओटीटीवरील अजय देवगण यांची ही पहिली गुन्हेगारी-नाटक मालिका असेल, आणि हा ब्रिटिश मालिकेच्या ‘ल्यूथर’ चा रिमेक असल्याची माहिती आहे.

ओटीटीवरील पदार्पणाविषयी बोलताना अजय देवगण यांनी पीटीआयला सांगितले होते की, “रुद्र – एज एज ऑफ डार्कनेस ही एक आकर्षक आणि अत्यंत उत्साही कथा आहे आणि मी हा नवीन प्रवास सुरू होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही! पडद्यावर एक कॉप प्ले करणे माझ्यासाठी नवीन नाही, परंतु या वेळी हे पात्र अधिक तीव्र, गुंतागुंतीचे आणि गडद आहे. एक नवीन पोलीस मी यात रंगवत आहे.
‘अनामिका’ शोधण्यात सुपरस्टार माधुरी दीक्षित
‘फाइंडिंग अनामिका’ या आशादायक वेब सीरिजसह या प्लॅटफॉर्मवर उतरेल.
या वेब सीरिजमध्ये ती मुख्य भूमिका साकारत असतांना, तिच्या सोबत संजय कपूर, मानव कौल, लक्ष्वीर सरन, सुहासिनी मुळे आणि मस्कन जाफरी यांचे सहकार्य असेल. एका जागतिक सुपरस्टार, पत्नी आणि एका आईची ही कथा आहे.
एक अशीर्षकांकित वेब मालिकेत शाहिद कपूर
येत आहे, यासाठी 70 कोटी इतकी रक्कम त्याला देणार आहेे. अद्याप या वेब मालिकेचे नाव अजून ठरवले नाही. यात राशी खन्ना, साशाची अग्रणी महिला म्हणून दिसणार आहे.

आपल्या डिजिटल पदार्पणाबद्दल बोलताना शाहिदने यापूर्वी एका पोस्टमध्ये शेअर केले होते, “मला जेव्हा कथेची कल्पना प्रथम ऐकली तेव्हा मला आवडली आणि तेव्हापासून आतापर्यंतची ही एक रोमांचक यात्रा आहे!
‘फॉलन’ या वेब सीरिज मध्ये सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. सोनाक्षी ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. डिसेंबर २०२० मध्ये तिने विजय वर्मा आणि गुलशन देवय्या यांच्यासमवेत वेब मालिकेच्या शुटिंगला सुरुवात केली होती. अंजली भाटी नावाच्या एका पोलिस भूमिकेची ही कथा आहे.

2021 च्या मार्च महिन्यात सोनाक्षीने ‘फॉलन’ चित्रपटाचे शूट पूर्ण केले होते, आणि त्यानंतर तिने सोशल नेटवर्किंग साईट वर म्हंटले,
“काय पडले मागे…. anything फॉलन’?
आश्चर्यकारक आठवणी, नवीन मित्र, दुचाकी चालविण्याची कौशल्ये आणि आनंदाने भरलेले हृदय”
यासह हा सेट सोडत आहे.. अनेक आठवणी…यावरून हेच समजते की एक उत्तम कलाकृती तयार झाली आहे आणि सोनाक्षीचा शूटिंगचा अनुभव आनंददायी आहे.
पाहूया नवीन वर्षात किती तारे वेब दुनियेत झळकणार आहेत ते? आणि हे नवीन क्षेत्र किती जणांना प्रसिद्धी देणारे ठरतात.

लेखन : कमल अशोक. नवी दिल्ली
संपादन : अलका भुजबळ. 9869484800.