मुंबईतील प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेस लर्निंग अँड एज्युकेशन विभागासाठी यंदाचा एमबिलियंथ पुरस्कार मिळाला आहे.
दक्षिण आशियात २०१० सालापासून डिजिटल एम्पॉवरमेंट फाऊंडेशन आणि वर्ल्ड समिट पुरस्काराच्या माध्यमातून उत्कृष्टतेचा सन्मान करणारे हे व्यासपीठ असून मोबाइल इनोव्हेशन आणि कंटेंट सर्व्हिसेससाठीचे कार्य करत आहे. पुरस्काराच्या ११ व्या आवृत्तीची घोषणा नुकतीच करण्यात आली. एमबिलीयंथ पुरस्कार २०२०-२१ च्या ११ व्या आवृत्तीमध्ये १२ विजेते आहेत.
सोशल आणि मोबाइल इनोव्हेशन, इस ऑफ नेव्हिगेशन, अर्थपूर्ण कंटेंट आणि सर्व्हिस, सर्व समावेशकता, पोहोच-प्रभाव आणि टिकाव नवकल्पना यासाठी पुरस्कार विजेत्यांना गौरवण्यात आले.
मोफत अँप
डिजिटल साक्षर फ्री लर्निंग हे शैक्षणिक अँप मोफत आहे. डिजिटल साक्षर अँप शासकीय शाळा, कमी उत्पन्न असणाऱ्या खासगी शाळा, मुख्यत: सामाजिक-आर्थिक दुर्बल पार्श्वभूमी असलेल्यांसाठी आहे.
मल्टीमीडिया सोबत समृद्ध अनुभव देणाऱ्या, संदर्भ शैक्षणिक सामग्रीसह, शालेय पाठ्यपुस्तकांच्या तुलनेत अधिक माहितीपूर्ण असतात. सुलभ शिकण्याची प्रक्रिया, शिकण्यास गती, निवडण्याची अनुमती, जटिल माहितीच्या पर्यायांसह ऑन-डिमांड व्हिडिओ, मराठी, हिंदी आणि इंग्रजीत डिजिटल मजकूर, नियमित मूल्यमापनासह हे नि:शुल्क आहे.
प्रथम इन्फोटेक फाऊंडेशनचा मजकूर २४ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहोचला असून ५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत थेट डिजिटल साक्षर कार्यक्रम पोहोचत आहे.

महाराष्ट्र- बिहारची अशीही युती
महाराष्ट्र आणि बिहार सरकारच्या भागीदारीने डिजिटल साक्षर कार्यक्रम ९५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत दूरचित्रवाणी (टेलिव्हीजन) आणि नभोवाणीद्वारे (रेडिओ) पोहोचला आहे.
अधिक माहितीसाठी आपण info@pif.org.in येथे संपर्क साधू शकता.

– लेखन : कमल अशोक, दिल्ली.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.