Tuesday, February 17, 2026
Homeबातम्या"प्रगतीशील" साहित्य संमेलन

“प्रगतीशील” साहित्य संमेलन

छत्रपती संभाजीनगर मधील प्रगतीशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित केलेले तीन दिवसीय द्वितीय साहित्य संमेलन नुकतेच संपन्न झाले.

संमेलनाचे उद्घाटन गुरुवार दिनांक ९ मार्चला सकाळी १० वाजता करण्यात आले. सुरुवातीला ग्रंथदिंडी काढण्यात आली. नऊवारी साड्या व दागिने घालून स्त्रीया व शुभ्र पांढऱ्या पोशाखात पुरुषमंडळी असा पेहराव करुन ऊत्साहात दिंडीत सामील झाले होते.

दीपप्रज्वलन, श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन झाल्यावर स्वरचित कविता वाचन व दुपारच्या सत्रात नाट्यगीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. प्रमुख पाहूणे ज्येष्ठ लेखक डॅा. श्री. वासुदेव मुलाटे हे होते.

शुक्रवारी १० मार्चला सकाळच्या सत्रात संस्थेतील लेखक व कवी यांच्या साहित्याचा परिचय करुन घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

दुपारच्या सत्रात
‘प्रसार माध्यमं: काळाची गरज, फायदे आणि दुष्परिणाम‘ या विषयावर परिसंवाद झाला. त्यात प्रा.सौ. सुनीता पाठक यांनी अतिशय परखडपणे त्यांची मतं मांडली. काही अनुभव पण सांगितले. प्रमुख पाहूणे अँन्यालायझर या वाहिनीचे संपादक श्री. सुशील कुलकर्णी हे होते. त्यांनी प्रसार माध्यमे विवेकाने वापरावीत हे सांगितलं.

सुनीता पाठक

महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेचे सचिव श्री. श्रीकांत पत्की यांनी वैयक्तिक रित्या संस्थेतील कर्त्रुत्ववान महिलांचा सत्कार केला.

तिसऱ्या दिवशी ११ मार्चला ‘स्री स्वातंत्र्य’ या विषयी चर्चासत्र घेण्यात आलं.

दुपारी प्रमुख पाहूणे, प्रसिद्ध कवी व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख
श्री. दासू वैद्य यांनी ज्येष्ठांचे महत्व आणि स्रुजनशीलता या विषयावर मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांनी  रचलेली  ‘मागणे’ ही कविता वाचून संमेलनाचा समारोप झाला.

हे संमेलन यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. भरत कुलकर्णी, उपाध्यक्षा सौ. विभा श्रीवास्तव, सचिव श्री. श्रीकांत पत्की यांनी खूप परिश्रम घेतले.

संमेलनास रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

मृदुला राजे on उज्ज्वल जीवन
Kavitha Tenny Nadar on झेप : 11