महात्मा ज्योतीबा फुले यांची आज जयंती आहे.
त्या निमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्द सुमनांजली…
– संपादक
महात्मा ज्योतीबा।
खरे क्रांतीकारी।
स्त्रियांचे कैवारी सुधारक ।।१।।
शिकली महिला।
शिके परिवार।
हाच सुविचार।
दिला त्यांनी ।।२।।
जर ध्येय नाही।
फेस साबणाचा।
नाही टिकायाचा।
ज्योती म्हणे ।।३।
जाती आणि लिंग।
बरा नाही भेदभाव।
करावा उठाव।
सांगे ज्योती ।।४।।
खरा एक धर्म।
सत्याचा असावा।
निर्धारे गाठावा। सांगितले ।।५।।
चैतन्याचा दिवा।
अंश इश्वराचा।
पिता शिक्षणाचा।
तो महात्मा ।।६।।

– रचना : राधिका भांडारकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹खूप सुंदर कविता 🌹