(अष्टाक्षरी काव्य लेखन)
आला गं बाई उन्हाळा
जीव कासावीस झाला
पाणी पाणी होई जीवा
आला सरबत वाला
कुल्फी आईस्क्रीम खावे
चिंचा बोरं देती मजा
कैरी पन्हे रसवंती
चला काढू थोडी रजा
लिंबू होतात महाग
साठवून वड्या करा
आले अतिथी स्वागता
जल तृप्ती मनी त्वरा
लाही लाही ही देहाची
छत्री शिरी धरायची
टोपी गाॅगल लावून
कांती मात्र जपायची
घरोघरी जल तृप्ती
कुंभाराचा करी माठ
कडूनिंब सेवनाने
हिंदोळ्याचा थाट माट
शरीराची होई शुद्धी
जल आवर्जून प्यावे
दीन वसाहती जाता
बिस्लेरीस ते वाटावे

– रचना : सौ शोभा कोठावदे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800