एका निवांत संध्याकाळी
गाव पावसात भिजत होतं
वाऱ्याच्या पंखावर स्वार होऊन
गारव्याच्या मिठीत शिरलं होतं
आकाशात रंगांची उधळण सुरू होती
जणू चांदण्याचं पांघरूण ते ओढत होत
सौंदर्याचा अर्थ मला उमगत होता
निसर्गाचा साज मला दिसत होता
नेमकं एक फुलपाखरू
माझ्या खांद्यावर येऊन बसलं
त्या स्पर्शाने मनातलं वादळ क्षणात संपलं
नाजूक पंखांनी मला हेरलं होतं
स्वच्छंदी उडायला शिकवलं होतं
सुगंधाच्या शोधत फिरणारी मी
पाखराने मलाच सुगंधी केलं होतं

रचना : राधा…
Very nice