अमेरिकेतील कॅन्सर संशोधक डॉ सुलोचना गवांदे यांनी संशोधन करून लिहिलेले “रिव्हीलींग सिक्रेटस ऑफ कॅन्सर” हे आणि इंग्लंड मध्ये ७ वर्षे राहून आता महाराष्ट्रात सेवा देणारे डॉ विनायक हिंगणे यांनी स्व अनुभवाच्या आधारे लिहिलेले
“क्रेव्हींग : खाण्याचे व्यसन” ही २ महत्वपूर्ण पुस्तके, महात्मा गांधी यांनी १९४६ साली स्थापन केलेल्या भारतातील पहिल्या निसर्गोपचार आश्रमाचे संचालक, निसर्गोपचार तज्ञ डॉ अभिषेक देविकर यांना नुकतीच न्यूज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी भेट दिली. यावेळी निवृत्त दूरदर्शन निर्माते राम खाकाळ हे ही उपस्थित होते.
ही दोन्ही पुस्तके पाहून डॉ अभिषेक देविकर यांनी ही पुस्तके आपल्याला नक्कीच खुप उपयुक्त ठरतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
