कारगिल युद्ध वीरांना करू अभिवादन
सर्व विश्वात भारताचा
राखिला सन्मान ।।ध्रु।।
शत्रूला चारले खडे शूरवीर सैन्यानं
लढले सैनिक
प्राणांची बाजी लावून
त्या शहिदांचे
करू स्मरण करू वंदन ।।1।।
देशासाठी निधडेपणे केले बलिदान
थोपवले शत्रूला सरहद्दी केले रक्षण
शत्रूला लाविले परतवून आणिले शरण ।।2।।
त्या वीरांचा, कुटुंबीयांचा करू सन्मान
ज्यांच्यामुळे आहोत सुरक्षित सुखी आपण
त्यांना करू मनानं आदरांजली अर्पण ।।3।।

— रचना : अरुण गांगल. कर्जत -रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
