सावधान, डोळ्याची साथ आली आहे.
हे जाणा. स्वतःला वाचवा.
प्रश्न : डोळे कसे येतात ?
उत्तर : डोळे आलेल्या माणसाच्या डोळ्यातून जे पाणी येते त्यात हा आजार करणारे जिवंत कण असतात. त्यांना १० ००० पट मोठे केले की ते दिसतात. त्यांना विषाणू म्हणतात. आपल्याला सर्दी, कोरोना, हे पण विषाणुंनी होतात.
या विषाणुंनी नाकाला त्रास दिला की ते गळते. त्याला आपण सर्दी म्हणतो. डोळ्यांना त्रास दिला की ते लाल होतात. सुजतात. खुपतात. गळतात. लाल होतात. डोळ्यांना खाज येते.
आधी १ डोळा गळतो. मग दुसरा.
आपण धीर ठेवावा. त्रास सहन करावा. याला तितिक्षा म्हणतात. ३-४ दिवसात आपण बरे होतो. १० पैकी ९ असे बरे होतील.
असे न झाले किंवा त्रास वाढला तर डॉक्टर कडे जा.
गेली ४० वर्षे मी कुणालाही औषध देलेले नाही. स्वतः ही घेतले नाही.
आम्ही सर्व बरे झालो. पैसे वाचले. औषधाचा त्रास वाचला.
हा आजार विषाणूंनी होतो.
साध्या पाण्याने डोळे धुवावे.
याला अँटी बायोटिक थेंब जरुरी नाही.
स्टिरॉइड थेंबाने हानी होवू शकते.
प्रश्न : घरी इतरांना डोळे येवू नये म्हणून काय करावे ?
उत्तर : आपले डोळे आल्यावर आपण हात लावलेल्या ठिकाणी दुसऱ्यांनी हात लावला की त्यांचे डोळे येवू शकतात. उदा. दाराची कडी, फोन, आदी. सर्वांपासून दूर रहावे.
आपले कपडे, भांडी अलग ठेवावी. आपण धुवावी.
डोळे आले तर संपूर्ण बरे होईपर्यंत घरी रहावे.
बाहेर जावून आपल्याच लोकांना आजार देवू नये. याने आपल्यामुळे आजार पसरणार नाही. ही सर्वोत्तम देश सेवा आहे.
कोरोना च्या काळात आपण जे जे केले, ते करून, डोळ्याची साथ आली आहे ती थांबवू या. हे सर्वाँना सांगा.
हे आपण न सांगितल्याने मित्रांची हानी झाली तर आपण जबाबदार.
हे सर्वांचे डोळे येण्याआधी सर्वाँना सांगा. शेअर करा.
जय हिंद.

— लेखन : डॉ. हेमंत जोशी. विरार.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
Very useful information