आई, प्रेयसी यांच्यावर अनेक कवींनी अनेक कविता केल्या आहेत.
पण बहुतेकांच्या नजरेतून त्यांना जन्मभर साथ देणारी पत्नी मात्र सुटली आहे. कवी सर्जेराव पाटील यांनी त्यांच्या या कवितेतून नेमके पत्नी ऋण व्यक्त केले आहे. या अनोख्या कवितेबद्दल कवी सर्जेराव पाटील यांचे मनःपुर्वक अभिनंदन.
– संपादक
प्रिय अर्धांगिनी ऐक जरा अव्यक्त मी व्यक्त होतोय सगळा
निखळ प्रेमाचा तू हाय स्वच्छ झरा
बळानंच तुझ्या फुलतोय संसार मळा
कणा तू हाय आम्हा साऱ्यांचा
पेलतेस भार ताकदीनं सदा
भावना मुक्या अन अर्थ तुझ्या शब्दांचा
समजून घेती तू आम्हा शतदा
भांडण होतात बरं
आमचीही कधीकधी
पण सांगतो फारकाळ नाही ती टिकत कधी
क्षमा करुनी मला तू क्षणामंधी
पुन्हा नव्या प्रेमानं होते तू प्रकट
सांभाळलस तू
सासर अन माहेर फुलागत
तू खजिनाच प्रितीचा
लाभला मला
पार करतेस कसरती
हसत अलगत
थकत कशी नाहीस
नाही मला कळत
अशी कशी ग तू
सर्व गुणांनी गुंफलेली
अविरत शिकतोय सारं तुज कडून
नाना कलांनी गं तू बहरलेली
लाभल्या मुलांना त्याच कला तुज कडून
कितीही करावं प्रेम तुझ्यावर
सदा मला ते अपूरच भासती
उपकार तुझं देवा माझ्यावर
दिलास तू मज शिंपल्यातील मोती
आनंदाच्या केक वरचं
नक्षीं तू
कल्पनाच अशक्य
जीवन तुझ्याविन
कोमल नाजूक
दवबिंदू तू
सात जन्म राहा तू माझीच अर्धांगिनी.

- — रचना : सर्जेराव पाटील. ऑस्ट्रेलिया
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
👌👍
सुंदर पत्नीकाव्य.