श्रावणाच्या सरी बरसता
नयनांत काहूर माजले
भावनांनी कल्लोळ मांडला
भेटण्यास तुज आतूर जाहले //१//
हुरहूर मनातील साठवण
ओढ लावली या लोचनी
अंगणात बहरे रातराणी
बरसे सरीवर सरी नयनी //२//
हृदयाच्या कंपनात येई
नाव सखया तुझेच रे
प्रीत कळली तुला न कधी
भारावून गेले मन माझेच रे //३//
श्रावणातला घन निळा
बरसतो बेधुंद होऊन
गंधाळलेल्या मोगऱ्यासम
जा मजला तू भेटून //४//

— रचना : परवीन कौसर. बेंगलोर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
श्रावण महिना हा सृष्टीत आणि मानवी जीवनात हिरवाई पेरणारा ऋतू.याचे अप्रतिम वर्णन कवितेतून जाणवते.