आज भारताचे चंद्रयान 3 चंद्रावर उतरले आणि करोडो भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या जल्लोषाच्या वातावरणात नीला बर्वे यांनी उस्फूर्तपणे, देशभक्तीने ओतप्रोत रचलेली कविता म्हणजे आपल्या सर्वांच्याच भावनांचे जणू प्रतीक आहे. इस्रो आणि सर्व शास्त्रज्ञांचे मनःपुर्वक अभिनंदन.
- संपादक
चंद्रावर आज तिरंगा लहरला
साऱ्या जगाचे लक्ष केंद्रित झाले
सॉफ्ट लँडिंग ऐतिहासिक ठरले
या क्षणाची नोंद आज झाली
देशभर भक्तिभावाने
पूजा अर्चा सुरू झाली
काशीला महागंगा आरतीसह
प्रार्थना केली गेली
कुणी हनुमान चालीसा म्हणाले
काहीनी चांद्रयानाची रांगोळी चितारली

शास्त्रज्ञांच्या अविरत मेहनतीच्या
फलसाफल्याचा हा क्षण आहे
यापुढे चंद्रावर वस्ती होऊन
अनेक बालके पहिले
पाऊल चंद्रावरच टाकतील
पण आज…
पण आज…
लॅन्डर विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरी उतरले
आणि हळूच दरवाजा उघडूनी रोव्हर हळूहळू
आपले पहिले पाऊल चंद्रावर ठेवले

या बाळाच्या
पहिल्या पावलाने
सारा भारत देश
एकच जल्लोष करतोय
पहिल्याच पावलाने
साऱ्यांची हृदय जिंकतोय
अन् एक इतिहास रचतोय !
जय हिंद !

— रचना : नीला बर्वे. सिंगापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर