गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयात हिंदी सप्ताह निमित्त नुकताच कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध मराठी-हिंदी गजलकार प्रा.डॉ.अविकुमार कासांडे यांनी हिंदी भाषा आणि साहित्याचे, राष्ट्र उभारणीत भरीव योगदान आहे असे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत जनाबाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ.दयानंद उजळंबे हे होते.
या प्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये प्रा.डाॅ.कीर्तीकुमार मोरे, हिंदी विभागाध्यक्ष प्रा.एम.डी.इंगोले प्रा.डॉ.एम.आर.हाके हे होते.
डॉ.अविकुमार कासांडे यांनी हिंदी भाषेचे वैश्विक महत्व, काही काही कथा सांगून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व आपल्या प्रेम, स्त्री-भ्रूण हत्या या विषयी गजलांच्या प्रस्तुतीकरणातून विद्यार्थ्यांना मंत्रमुंग्ध केले.
या प्रसंगी डॉ.कीर्तिकुमार मोरे यांनी हिंदीतून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.दयानंद उजलंबे यांनी मोलाचे विचार व्यक्त केले.
प्रा. डॉ.एम.डी.इंगोले यांनी वर्तमान कालात आत्मनिर्भर होण्यासाठी हिंदी शिकणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगितले.
प्रारंभी संत जनाबाईंच्या प्रतीमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.

कु.महेजबीन शेख, कु.सातपुते प्रतिमा, कु.उर्मिला सोलंके, कु.कोमल जाधव, अजिंक्य मादाले, मुंडलिक अमर इ.नी हिंदी कविता व आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात शेख अलिशा, कु.भारती सालवे, कु.वैष्णवी किंगरे, सय्यद तनवीर, कु.महेजबीन शेख, कु.गौरी शिंदे, कु.स्नेहा सुरनर, कु.श्रावणी मोकाशे, कु.स्मीता कांबले, कु.तेजस्वीनी वावले, कु.स्वाती कांबले, कु.योगिता भीसे, कु.अरूणा बेले
विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 15 भीत्तीपत्रकांचे विमोचन करण्यात आले. तसेच या प्रसंगी विद्यार्थींच्या हिंदी अभ्यास मंडलाचे उद्घाटन करण्यात आले.
भाषणात व भीत्तीपत्रकात सहभागी मुला-मुलिंना हिंदी लिखानासाठी प्रेरणा मिळावी म्हणून नोट पैड व पेनींचे वितरण करण्यात आले.
या साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.धूत यांचे मोलाची प्रेरणा दिली.
उपप्राचार्य संतोष गायकवाड़, का.अधिक्षक भारत हत्तीअंबीरे, श्रीनिवास खलिकर यांनी अमृत कदम मोलाचे सहकार्य केले.
सूत्र संचालन कु.संध्या भोसले, प्रास्ताविक प्रा.सुहास देशमाने, आभार प्रा.पाटिल यांनी मानले.
उपस्थितांमध्ये डॉ.डोंगे, डॉ.धनजकर, विजय बेरलीकर,डॉ.वर्षा भूतडा,डॉ.रायटक मैडम हे होते.
महाविद्यालयाचे हिंदीविभाग प्रमुख प्रा.डाॅ.एम.डी.इंगाेले, प्रा.डॉ.भेंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या समारंभाचे आयोजन करण्यात आले हाेते.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800