“दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल..”
आपल्या भारतीय संस्कृतीचा अध्यात्मिक वारसा जपणाऱ्या या संतांच्या भूमीत अनेक संतांनी जन्म घेतला आणि भारत भूमी पवित्र पावन केली. याच भूमीला पारतंत्र्यातून सोडवण्यासाठी महात्मा गांधी या साबरमतीच्या संताने तर सत्य, अहिंसा, दया आणि सहिष्णुता या मूल्यांतून जनतेच्या मनात स्वातंत्र्याची ऊर्जा जागवली. म्हणूनच बहुतेक त्यांच्या अहिंसक स्वभावाला समर्पित करणारे
“साबरमती के संत तुने कर दिया कमाल”
हे गीत 1954 साली आलेल्या “जागृती” या चित्रपटात समाविष्ट केलेले असावे.
या गीताचे हे अमृतमय बोल आपल्या सारस्वत लेखणीतून शब्दबद्ध केले ते गीतकार, कवी प्रदीप यांनी…. त्याला ताल आणि लयीत बांधून ठेवण्याचं महान कार्य केलं संगीत दिग्दर्शक हेमंतकुमार आणि तितकीच भावस्पर्शी आर्द्रता, तन्मयता आपल्या कंठातून पाझरवणाऱ्या, व्हर्सेटाइल रेशम, मुलायम आवाजाच्या गायिका आशाताई यांनी हे गीत स्वरबद्ध केल आहे…
या गीतातून पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांच्या स्वाधीन असलेल्या भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देताना म. गांधी यांनी कार्याबद्दल बोलताना गीतकार लिहितात..
“धरती पे लडी तुने अजब ढंग की लडाई
दागी ना कही तोफ ना बंदूक चलाई
दुष्मन के किले पर भी न की तूने चढाई”
जिकडे तिकडे बंदूक, तोफा, बॉम्बगोळा यातून युद्ध होत असताना केवळ सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने या साबरमतीच्या संताने कमाल करीत सर्वांना रघुपती राघव राजाराम मंत्रमुग्ध केले. ढाल तलवारी शिवाय स्वातंत्र्य मिळवून दिले..

“शतरंज बिछाकर यहाँ बैठा था जमाना
लगता था के मुश्किल हैं फिरंगी को हराना”
तरी सुद्धा आपले बापूजी यांनी कशाला ही न जुमानता हार मानली नाही. देशाच्या लढाईत ते उस्तादोंके उस्ताद निघाले. आणि सर्वांच्या युक्त्या प्रयुक्त्यांना गुंडाळत
“दे दी हमे आजादी…..
जब जब तेरा बिगुल बजा जवान चल पडे
मजदूर चल पडे किसान चल पडे”
एवढचं नाही तर हिंदू मुस्लिम वादात न पडता गांधीजीच्या पावलावर पाऊल ठेवत स्वातंत्र्य संग्रामा साठी कोट्यवधी लोक निघाले… पं नेहरू सुद्धा फुलों की सेज छोड के दौड पडे
कारण इथे प्रत्येकाला म. गांधीजींच्या अहिंसेच्या तळमळीची, सत्यासाठी लढणाऱ्या तत्वांची जाणिव झाली होती.
“वैसे तो देखने में ‘थी हस्तीं तेरी छोटी
लेकिन तुझे झुकती थी हिमालय की चोटी
दुनिया में तू बेजोड था इन्सान बेमिसाल”
असं कार्य करीत
अमृत दिया सभी को मगर खुद जहर पिया
म्हणूनचं तर त्यांच्या अंत समयीं
रोया था महाकाल
हेच येणारी पिढी या गीतातून लक्षात ठेवेल…
कारण आजची पिढी देखील तितकीच देशप्रेम, देशभक्ती यांची जपणूक करणारी आहे.
या पिढीला सलाम करीत अशीच गाणी ऐकावीत आणि हीच त्यांना आदरांजली ठरेलं .. हिच अपेक्षा..

— लेखन : सौ अनिता व्यवहारे. श्रीरामपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
