Monday, September 15, 2025
Homeसाहित्यमैत्री अमृत

मैत्री अमृत

बालपणाची मैत्री जीवाची गट्टी
खेळातली मस्ती कुस्ती
चिंचेसारखी, कैर्‍यांसारखी आंबट चिंबट
चिमणीच्या दाताची गोडी ||१||

ओढ्यामधल्या सुरकांड्या
शाळेतल्या मास्तरांच्या छड्या
पेरूच्या झाडावरील उड्या
वयात आल्यावर मैत्रीचे लोणचे ||२||

स्वप्नांना हातात झेलताना
मैत्रीतला विश्वास अढळ
अटळ असते स्मरण
जपुन ठेवलेले क्षण ||३||

मैत्री असते अमृत
जगण्याचे,प्रगतिचे मार्ग
मैत्री निखळ आनंद
ह्रदयाची साथ संगत ||४||

मैत्री आत्मविश्वास जगण्यातला
मैत्री अनमोल अनपेक्षित बहरणे
मैत्री दोन रूपे आत्मा एक
मैत्री अमर स्वर्गाचे द्वार ||५||

डॉ अंजली सामंत

— रचना : डॉ अंजली सामंत. डहाणू
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा