भारतीय लष्करातील कॅप्टन अंशुमन सिंग हे प्रचंड खडतर अशा सियाचीन प्रदेशात भारत मातेचे रक्षण करताना धारातीर्थी पडले. त्यांच्या या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर “किर्तीचक्र” हा पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते हा पुरस्कार कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या पत्नी स्मृती यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या भावपूर्ण कार्यक्रमात स्वीकारला.
पुरस्कार स्वीकारल्या नंतर माध्यमांशी बोलताना वीर पत्नी स्मृती यांनी सांगीतले की, आमचं लग्न होऊन दोन महिन्यांनीच कॅप्टन अंशुमन सिंग यांची नेमणूक सियाचीन प्रदेशात झाली होती. अंशुमन धारातीर्थी पडल्याच्या आदल्या दिवशीच आम्ही आपले भावी जीवन कसे असेल, या विषयी खूप बोललो होतो. आणि दुसऱ्या दिवशीच ते शहीद झाल्याची खबर मिळाली.ते गेले यावर माझा विश्वास बसत नव्हता.पण आता किर्तीचक्र माझ्या हातात असल्याने या सत्यावर मला विश्वास ठेवावाच लागणार आहे.देशासाठी अंशुमन यांनी प्राणाची आहुती दिली आहे.त्यापुढे आमचं जीवन जगणं काहीच नाही.
खरोखरच धन्य ते वीर, धन्य त्या वीरमाता आणि वीरपत्नी ज्यांच्यामुळे आपण सर्व सुखाने जगू शकतो, झोपू शकतो. सलाम या सर्वांना. सलाम भारताच्या सर्व संरक्षण दलातील अधिकारी आणि जवान यांना.
वीर पत्नी स्मृती यांचे धीरगंभीर निवेदन आपण पुढील व्हिडीओत अवश्य पहा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
अंशुमन सिंग हे खरे भारतीय पुत्र आहेत .त्यांचे कार्य आणि आणि त्याग हे प्रेरणादायक आहे.
.
शहीद वीरास आणि त्यांच्या पत्नीस सलाम सलाम सलाम