अलवार स्पर्शाची ओढ
लागली वेड्या मनाला
मिलनाची चाहूल लागता
साज चढवला तनाला //१//
आसुसलेले हळवे मन
जीव तुझ्यावर जडलेला
आठवणीत तुझ्या राहता
लोचनातून अश्रू ओघळला //२//
वेड्या मनाला वाटले
सर बरसावी पावसाची
झोकून देऊन मिठीत
लहर उठवावी सुखाची //३//
थेंबा थेंबांनी शृंगार केलेल्या
पावसात जाऊन भिजावे
हात घेऊन तुझा हातात
न्हाहून तृप्त व्हावे//४//
— रचना : परवीन कौसर. बेंगलोर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
छान कविता 👌👌