Thursday, December 26, 2024
Homeसाहित्यमी एक झाड

मी एक झाड

आजपासून सौ शितल अहेर, खोपोली (पूर्वाश्रमीच्या नागपूर येथील शितल मधुकर मुने) या न्यूज स्टोरी टुडे परिवारात सहभागी होत आहेत. त्या एम.एस.डब्ल्यू. असून त्यांनी काही काळ “आदिम आदिवासी सेवक संघ” या स्वयंसेवी संस्थेत काम केले आहे. शितल अहेर यांना अभिनयाची आवड असून त्यांनी कामगार कल्याणच्या नाट्य स्पर्धेच्या अनेक नाटकात भूमिका केल्या आहेत. अभिनयासोबत त्यांना कथा, कविता लिखाणाची आवड आहे. पण लग्नानंतर बरीच वर्षे घरच्या जबाबदारीमुळे अभिनय, लिखाण आणि वाचनापासून त्या दुरावल्या होत्या. पण दोन वर्षांपूर्वी खोपोलीतील “वीरेश्वर कला मंच” या संस्थेद्वारे त्या पुन्हा नाटकात कामे करू लागल्या आहेत. त्या”कोकण मराठी साहित्य परिषद, खोपोली शाखेच्या त्या सदस्य असून आता पुन्हा त्यांनी लेखनास सुरुवात केली आहे.

शितल अहेर यांनी “मी एक झाड” या कवितेतून झाडाची, आपल्याला अंतर्मुख करणारी करुण कहाणी सांगितली आहे. त्यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात स्वागत आहे.
– संपादक

मी एक झाड 🌲

होत छोटंसं रोपटं
एका भल्या नेत्याने,
मला मैदानात पेरलं
भरपूर पाणी घातलं,
म्हणून त्याचे ॠण,
मी माझ्या ह्रदयात कोरले

मी एक झाड 🌲
फोटो काढून सर्व गेले परतून,
मग नाही पाहिले मागे वळून
पानं गेली गळून,
अन्न- पाण्याविना मी गेलो कोमेजून

मी एक झाड 🌲
स्वतः जगायची घेतली हमी
अन्न पाण्याच्या शोधात गाठली,
जमिनीची खोली तसतशी वाढत गेली,
आभाळ उंची धरणीशी घट्ट हे आईचे नाते
जुळले ऊन, वारा, पाऊस यांच्याशी
नातं मैत्रीच हे जुळलं

मी एक झाड 🌲

मुलं मैदानात खूप खेळायची,
धिंगा मस्ती करायची
थकल्यावर मात्र माझ्याच छायेत निजायची
ये- जा करणाऱ्या वाटसरूना पण,
माझीच सावली आवडायची

मी एक झाड 🌲
अशीच वर्ष सरत गेली,
निसर्गाशी मैत्री रंगत आली
आठवण मात्र त्या भल्या नेत्याची
रोज येत होती

मी एक झाड 🌲
एकदा तोही दिवस उजाडला
तोच भला नेता चार लोकां समवेत आला
“ये ये मित्रा, कसे फेडू तुझे उपकार
तुझे खूप खूप आभार
तुझ्यामुळे जीवन झाले साकार

मी एक झाड 🌲
त्यातील एका व्यक्तीने
नकाशावर बोट फिरवल
तेच बोट माझ्याकडे वळवलं
“साहेब करायचा असेल प्रोजेक्ट,
या झाडाला करा रिजेक्ट,
आता पाडा याची विकेट
हे ऐकून मी हळहळलो
“नको नको मित्रा,
जन्मदाता बाप आहेस तू माझा
नको मारू मला ऐक ना जरा”
नाही ऐकली त्यांनी माझी आर्त हाक
सपासप केले कुऱ्हाडीचे वार
मी झालो रक्तबंबाळ

मी एक झाड 🌲
फक्त.. एक झाड
मानवाला दिली मी, हृदयात वास्तू
पण त्याने मला समजले,
फक्त उपभोगाची वस्तू
मी…. फक्त एक झाड
मी…. फक्त एक झाड 🌲

— रचना : सौ. शितल अहेर. खोपोली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

12 COMMENTS

  1. सध्याच्या भौगोलिक,सामाजिक व राजकीय परिस्थिती वर मार्मिक भाष्य करणारी “झाड ” या कवितेतुन सौ शितल अहेर या भगिनींने पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. योग्य शब्दरचनेची सांगड घालुन समाजापुढे एक आदर्श संदेश प्रस्तुत केला आहे. असेच साहित्याची उधळण होवो ही मनःपूर्वक सदिच्छा.
    मी श्री संजय श्रीनिवास पवार. जनरल ईन्शुरन्स या क्षेत्रात कार्यरत आहे.

  2. माज नाव गणेश इंदुरकर मला या कविता वाचून माजा मनाला
    खूप टोचली गोष्ट की आपण तर या झाडावर प्रेम करून सुद्धा आज आणि आधी तरी आपण पण असच होणार
    अभिनंदन मावशी कविता वाचून मला आनंद झाला 🙏

  3. तुमची कविता खूप छान आहे आणि आजच्या समाजाला चांगला संदेश देते

  4. खूपच सुंदर कविता केली आहें झाडावर. अप्रतिम ❤️❤️❤️👌👌👍👍

  5. झाडा विषयी विविध काव्य लेखन व झाडांची महती सुंदर मांडणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९
शारदा शेरकर on अंदमानची सफर : ९