Friday, January 3, 2025
Homeसेवाअनोखी भाऊबीज भेट द्या !

अनोखी भाऊबीज भेट द्या !

दिवाळी लवकरच येत आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. या निमित्ताने कष्टकरी बहिणींच्या जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याची संधी नवी मुंबईतील प्रभात महिला बचत गट घेऊन आले आहे.

कामगार महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत “प्रभात” महिला बचत गटातील महिलांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पणत्या, उटणे साबण, उटणे पावडर, रोज कॅण्डल, आकाश दिवे इत्यादी आकर्षक वस्तू तयार केल्या. परंतु महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुक आचारसंहितेमुळे दरवर्षी उपलब्ध होणारे सरकारी व इतर संस्थांचे स्टॉल्स यावर्षी रद्द झाले आहेत. त्यामुळे या उत्पादनाला बाजारपेठ मिळण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे.

दीपावली निमित्त आपले नातेवाईक, हितचिंतक व आदरणीय व्यक्तिमत्व यांना प्रभात महिला बचत गटाद्वारे निर्मित गिफ्ट बॉक्स आपण स्वतः भेट देऊ शकता किंवा आपल्या संपर्कातील कंपनी, ऑफिस, व्यावसायिक यांना अशा भेट वस्तू घेण्यासाठी विनंती करू शकता. आपल्या सोशल मीडियावर या संदर्भातील रील, व्हिडिओ व फोटो पोस्ट केल्यास ही संकल्पना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल.

शाळा, महाविद्यालय, ऑफिस, मॉल इत्यादी ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी आपण प्रभात ला मदत करू शकता.

आपण केलेला छोटासा सहयोग या कष्टकरी बहिणींसाठी मोठीच भाऊबीज भेट ठरेल.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Pratibha Saraph on नव वर्ष ..
आशी नाईक on कवी
विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !